२४,३७४ कोटींचे नऊ रेल्वे प्रकल्प
By admin | Published: August 25, 2016 05:00 AM2016-08-25T05:00:06+5:302016-08-25T05:00:06+5:30
रेल्वेचे जाळे विस्तारित करून संपूर्ण देशाला रेल्वेने जोडण्यासाठी २४,३७४ कोटी रुपयांच्या नऊ रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील देण्यात आला
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- रेल्वेचे जाळे विस्तारित करून संपूर्ण देशाला रेल्वेने जोडण्यासाठी २४,३७४ कोटी रुपयांच्या नऊ रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील देण्यात आला असून, याचा मोठा लाभ महाराष्ट्राला मिळणार आहे.
प्रवासी आणि मालवाहतुकीसह विशेषत: अन्नधान्य, कोळसा, खनिज आणि पोलाद वाहतुकीचा विस्तार करीत, देशभरात रेल्वे पोहोचविण्याच्या उद्देशासाठी प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत करण्यासह पायाभूत क्षेत्र विकसित करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत बुधवारी रेल्वे मार्गाच्या विस्तार आणि नवीन रेल्वे मार्ग उभारण्यासह नऊ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
राजनंदगाव-नागपूर (कलुम्ना), तसेच गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांदरम्यान महाराष्ट्रात तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यास (१,९०८.५१ कोटी रुपये) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने मंजुरी दिली आहे.