Nipah virus: निपाह विषाणूचा धोका वाढला, अशी आहेत लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 04:53 PM2021-09-06T16:53:14+5:302021-09-06T16:54:04+5:30

Nipah virus update: केरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. त्यातच राज्यात निपाह विषाणूचेही रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.

Nipah virus: Increased risk of Nipah virus, symptoms and measures to prevent it | Nipah virus: निपाह विषाणूचा धोका वाढला, अशी आहेत लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय 

Nipah virus: निपाह विषाणूचा धोका वाढला, अशी आहेत लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय 

Next

नवी दिल्ली -केरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. त्यातच राज्यात निपाह विषाणूचेही रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात निपाहचा पहिला रुग्ण सापडला आहे. (Nipah virus) त्यामुळे येथे एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे निपाह विषाणूबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण निपाह विषाणूची लक्षणे आणि त्यापासून बचावासाठीच्या उपाययोजना जाणून घेऊयात. (Increased risk of Nipah virus, symptoms and measures to prevent it)

निपाह विषाणू एक जुनोटिक आजार आहे. तो प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. हा विषाणू केवळ ज्यांच्या पाठीला कणा आहे अशाच प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये येतो. तसेच माणसांमधून माणसांमध्येही या विषाणूचा फैलाव झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. सर्वप्रथण मलेशियामध्ये डुक्कर पाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये याची लक्षणे दिसून आली होती. बंगालमधील सिलीगुडीमध्ये २००१ आणि २००७ मध्ये हा आजार दिसून आला होता. हा विषाणू बहुतांशी एका विशिष्ट्य भागातच राहतो. तसेच रोगी संपर्कात आल्यास पसरतो.

निपाह विषाणूच्या संसर्गाची लक्षणे 
- जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार निपाह विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सुरुवातीला ताप, डोकेदुखी, स्नायूंचे दुखणे, उलटी आणि घशामध्ये खवखव अशी लक्षणे दिसून येतात. 
- त्यानंतर चक्कर येणे आणि एन्सेफललायटीससुद्धा होऊ शकतो. काही रुग्णांना असामान्य निमोनिया आणि श्वसनासंबंधीच्या गंभीर समस्या दिसून येतात. 
- गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या रुग्णाला एन्सेफलायटीस आणि झटके येऊ शकतात. त्यानंतर रुग्ण २४ ते ४८ तासांमध्ये कोमात जाऊ शकतो. हा विषाणू ४ ते १४ दिवसांपर्यंत अॅक्टिव्ह राहतो. 
निपाह विषाणू हा बाधित डुक्कर किंवा फळ खाणाऱ्या वटवाघळांच्या माध्यमातून फैलावतो. बांगलादेश आणि भारतामध्ये हा विषाणू सर्वसामान्यपणे फळे किंवा फलांपासून घेण्यात येणाऱ्या उत्पादनांपासून पसरतो. त्याच्या संसर्गाचे सर्वात मोठे कारण हेच आहे.  

बचावासाठीचे उपाय 
- जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जर निपाह विषाणूच्या संसर्गाचा संशय असल्यास त्या जनावरांचा परिसर त्वरित सोडला पाहिजे. तसेच ही जागा क्वारेंटाईन केली पाहिजे.
- लोकांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी बाधित जनावरांना नष्ट करावे, तसेच या जनावरांचे मृतदेह तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दफन करा
- बाधित शेतांमधून प्राण्यांची ये जा आणि अन्य भागात प्रतिबंधात्मक उपाय केल्यामुळे आजाराचा प्रसार कमी करता येऊ शकतो. कच्च्या खजुराचा रस किंवा ताडीचे सेवक करता कामा नये. केवळ धुतलेल्या फळांचे सेवक करावे. जमिनीवर पडलेली अर्धवट फळे खाणे टाळा 
 

Web Title: Nipah virus: Increased risk of Nipah virus, symptoms and measures to prevent it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.