Nipah Virus : "निपाहचा धोका अद्याप टळलेला नाही, येऊ शकते दुसरी लाट"; मुख्यमंत्री विजयन म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 01:37 PM2023-09-20T13:37:05+5:302023-09-20T13:45:19+5:30
Nipah Virus : "कोझिकोड जिल्ह्यातून निपाह प्रकरणे का नोंदवली जात आहेत याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) देखील स्पष्ट उत्तर देऊ शकत नाही."
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मंगळवारी सांगितले की, कोझिकोड जिल्ह्यातील निपाहचा उद्रेक नियंत्रणात आहे, मात्र रोगाचा धोका अद्याप टळलेला नाही. सध्या निपाहच्या उद्रेकाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आढावा बैठकीच्या पत्रकार परिषदेत "निपाहचा धोका पूर्णपणे टळला आहे असे म्हणता येणार नाही, मात्र हा आजार फारसा लोकांपर्यंत पसरलेला नाही ही दिलासादायक बाब आहे" असं म्हटलं आहे.
निपाहसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. दुसरी लाट येण्याची शक्यता फार कमी असली तरी ती पूर्णपणे नाकारता येत नाही, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. विजयन म्हणाले की, राज्याची आरोग्य यंत्रणा घातक व्हायरसचा प्रसार प्रभावीपणे रोखू शकते. आरोग्य यंत्रणा काळजीपूर्वक काम करत आहे. व्हायरस लवकर सापडल्याने धोकादायक परिस्थिती टळली.
मुख्यमंत्र्यांनी कोझिकोड जिल्ह्यातून निपाह प्रकरणे का नोंदवली जात आहेत याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) देखील स्पष्ट उत्तर देऊ शकत नाही. 36 वटवाघळांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, परंतु कोणताही व्हायरस आढळला नाही आणि येत्या काही दिवसांत आणखी नमुने गोळा केले जातील. पोलिसांच्या मदतीने प्रथम बाधित व्यक्तीचा ‘रूट मॅप’ घेण्यात आला आणि या ठिकाणांहून वटवाघळांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले जातील असं सांगितलं.
विजयन म्हणाले की, कोझिकोडमध्ये हा आजार पुन्हा का होत आहे याचे स्पष्ट उत्तर ICMR कडेही नाही. याबाबत राज्याने सविस्तर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. कोझिकोड मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी लॅब आणि जवळच्या थोन्नाकल येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड व्हायरोलॉजी लॅब'मध्ये या चाचण्या सुरू राहतील. यापूर्वी 2018 आणि 2021 मध्ये कोझिकोड जिल्ह्यात निपाहची प्रकरणे समोर आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.