Niraj chopra : टोकियोत भारताने इतिहास रचला, PM नरेंद्र मोदींकडून नीरज चोप्राचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 06:31 PM2021-08-07T18:31:45+5:302021-08-07T20:38:30+5:30
भारताने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. टोकियोत भारताने इतिहास रचला. नीरज चोप्राने आज संस्मरणीय असा खेळ केला.
Tokyo Olympic, Neeraj Chopra : मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६४ व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली होती. पण, अॅथलेटिक्समधील इतिहास आज नीरज चोप्रानं बदलला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. ( Men's javelin throw final) भालाफेकीच्या अंतिम फेरीत उतरलेला नीरजच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता. त्यानं पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. २००८नंतर (अभिनव बिंद्रा, नेमबाज) ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला.
भारताने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. टोकियोत भारताने इतिहास रचला. नीरज चोप्राने आज संस्मरणीय असा खेळ केला. युवा नीरजने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नीरजच्या संयमाचं, धैर्याचं आणि अतुलनीय प्रदर्शनाचं कौतुकच. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. टोकिया ऑलिंपिकमध्ये देशाला पहिलं गोल्ड मिळवून दिल्यानंतर नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियातून नीरजचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
History has been scripted at Tokyo! What @Neeraj_chopra1 has achieved today will be remembered forever. The young Neeraj has done exceptionally well. He played with remarkable passion and showed unparalleled grit. Congratulations to him for winning the Gold. #Tokyo2020https://t.co/2NcGgJvfMS
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2021
नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भालाफेक केली. क्रमवारीनुसार त्याला दुसऱ्या क्रमांकावरून स्पर्धेत सुरुवात करावी लागली. ( Neeraj starts with massive 87.03m in 1st attempt. ) रिपब्लिक ऑफ मोल्डोव्हाच्या अॅड्रीयन मार्डारे हा प्रथम भालाफेकीसाठी आला अन् त्यानं ८१.१६ मीटर लांब भालाफेक केली. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं सत्रातील सर्वोत्तम कामगिरी करताना ८५.३० मीटर लांब भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्षद नदीमनं पहिल्या प्रयत्नात ८२.४० मीटर लांब भालाफेक केली. चेक रिपब्लिकच्या जाकूब व्हॅड्लेचनं ८३.९८ मीटरचे अंतर गाठून पहिल्या फेरीअखेरीस टॉप फाईव्हमध्ये स्थान पक्के केले. नीरजनं अव्वल स्थान टिकवून ठेवले.
नीरज ने जैवेलिन को पहुंचाया सूरज तक!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 7, 2021
India shines brighter today because of you, Neeraj.
Your javelin carried the tricolour 🇮🇳 all the way and made it flutter with the pride of every Indian.
What a moment for Indian sport!#Olympics#Tokyo2020#Athletics#Goldpic.twitter.com/FZ52Ti6EZc
नीरज चोप्राच्या बाहूत 130 कोटी भारतीयाचं बळ दिसलं
His arm represents the strength of 1.3 billion people! 🇮🇳 #NeerajChopra#Goldpic.twitter.com/GrMQ51qO1l
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 7, 2021
तो रॉकेट आहे, बिलियन्स भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू. नीरज चोप्रा तू चॅम्पीयन आहेस, या आनंदाबद्दल तुझे आभारी आहोत
Woooww!
— Virender Sehwag (@virendersehwag) August 7, 2021
He’s a rocket ,it’s a Gold and there are a billion tears of joy.
Such days don’t come easy.
The first Indian ever to win a Olympic medal in Athletics and it is a #GoldMedal . #NeerajChopra you champion. We are so proud of you. Thank you for giving us so much joy. pic.twitter.com/2MHz2tht7F
नीरजची दमदार कामगिरी
दुसऱ्या प्रयत्नात नीरजनं कामगिरी आणखी उंचावली अन् ८७.५८ मीटर लांब भालाफेकून प्रतिस्पर्धींना गपगार केले. ( Neeraj Chopra second attempt: 87.58) त्याला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या सहकारी अन् प्रशिक्षकांनी पदकाचा जल्लोष तेव्हाच सुरू केला. नीरजनं सेट केलेल्या लक्ष्याचा आसपासही प्रतिस्पर्धींना फिरकता आले नाही. पहिल्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ज्युलियनला दुसऱ्या प्रयत्नात ७७.९० मीटर भाला फेकता आला. नीरजची भालाफेक पाहून प्रतिस्पर्धी दडपणात गेलेले दिसले. तिसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजला ७६.७९ मीटर लांब भाला फेकता आला. चेक प्रजासत्ताकच्या व्हितेझस्लॅव्ह व्हीसलीनं तिसऱ्या प्रयत्नांत ८५.४४ मीटर लांब भाला फेकून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तानच्या नदीमनं ८४.६२ मीटर लांब भालाफेकून पदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.