Nirav Modi Properties Seized: ईडीची नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई, हाँगकाँगमधील 253 कोटींची संपत्ती जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 07:50 PM2022-07-22T19:50:22+5:302022-07-22T19:50:52+5:30
ED Seized Nirav Modi Movable Properties: ईडीने नीरव मोदीशी संबंधित जंगम मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांसह बँकेतील रकमेचा समावेश आहे.
ED Action Against Nirav Modi:अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीने शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे, नीरव मोदीशी संबंधित कंपन्यांची हिरे, दागिने आणि बँक ठेवींसह एकूण 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
केंद्रीय एजन्सीने एका निवेदनात म्हटले की, या सर्व जंगम मालमत्ता हाँगकाँगमध्ये आहेत. मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून या सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. नीरव मोदीच्या हाँगकाँगमधील मालमत्तेमध्ये एका खासगी तिजोरीत ठेवलेले हिऱ्यांचे दागिने आणि तेथील बँक खात्यांमधील रकमेचा समावेश आहे.
ED has provisionally attached movable properties i.e. Gems and Jewelleries and Bank Balance amounting to Rs 253.62 Crore (as of today) in the case of Nirav Modi group of companies in Hong Kong. With this, total attached/ seized assets tally in the case stands at Rs. 2650.07 Cr pic.twitter.com/WhAxN5ZfKA
— ANI (@ANI) July 22, 2022
पीएमएलएच्या तरतुदींनुसार मालमत्ता जप्त
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार नीरव मोदीच्या मालमत्तांची तात्पुरती जप्ती करण्यात आली आहे. नीरव सध्या ब्रिटनच्या तुरुंगात कैद असून, त्याच्याविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (पीएमएलए) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अब्ज डॉलर्सच्या(सूमारे 6,498.20 कोटी) फसवणुकीतील तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) करत आहे.