निर्भया प्रकरणातील बालगुन्हेगार रमलाय चित्रकलेत

By admin | Published: September 4, 2014 02:09 PM2014-09-04T14:09:58+5:302014-09-04T14:42:05+5:30

निर्भया बलात्कारप्रकरणातील बालगुन्हेगाराने बालसुधारगृहात काढलेली आकर्षक चित्रे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

In the Nirbhaya case, the culprit is in the picture | निर्भया प्रकरणातील बालगुन्हेगार रमलाय चित्रकलेत

निर्भया प्रकरणातील बालगुन्हेगार रमलाय चित्रकलेत

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ -  बलात्कार, हत्यासारखे गंभीर गुन्हे करणा-या अल्पवयीन गुन्हेगारांवर प्रौढांप्रमाणेच खटले चालवण्याची मागणी जोर धरत असतानाच निर्भया बलात्कारप्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराने बालसुधारगृहात काढलेली आकर्षक चित्रे हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने बालसुधारगृहात महिलांची विविध रुपे दाखवणारी आकर्षक चित्र रेखाटली असून यातील निवडक चित्रं आता एका स्पर्धेसाठीही पाठवण्यात आली आहे.
डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीतील धावत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. न्यायालयाने पाच आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. मात्र सहावा आरोपी अल्पवयीन असल्याने बालगुन्हेगार न्यायालयाने त्याला तीन वर्षांसाठी बालसुधार गृहात पाठवले होते. गंभीर गुन्हा करुनही या अल्पवयीन गुन्हेगाराला कायद्याचे संरक्षण मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होता. मात्र बालसुधारमध्ये गेल्यापासून या बालगुन्हेगाराच्या वागणुकीत सुधारणा होत असल्याचे समोर येत आहे.
वॉशिंग्टन पोस्ट या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार संबंधीत अल्पवयीन आरोपी हा सुधारगृहात उत्तम चित्र रेखाटत आहे. आरशासमोर बसलेल्या एका राजकुमारीचे 'प्रिन्सेस' आणि 'नृत्य करणा-या गावातील महिला' या त्याच्या चित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यातील निवडक चित्रे एका स्पर्धेत पाठवण्यात आली असून यात त्याला हमखास पारितोषिक मिळेल असा विश्वास सुधारगृहाचे अधीक्षक राजीव लाकरा यांनी व्यक्त केला. चित्रांसाठी पारितोषिक मिळावे असे त्यालाही वाटत असून तो बदलल्यास जगही त्याला नक्कीच स्वीकारेल असे लाकरा यांनी सांगितले. त्याच्या चित्रांमधून राग किंवा हिंसक भावना व्यक्त होत नसून जगाने त्याला स्वीकारावे यासाठी तो अथक मेहनत घेत असल्याचे सुधारगृहात आर्ट थेरपी घेणा-या मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: In the Nirbhaya case, the culprit is in the picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.