देशात 1991पासून आतापर्यंत 16 दोषींना फाशीची शिक्षा; निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना 22 जानेवारीला होणार फाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 09:28 AM2020-01-08T09:28:50+5:302020-01-08T09:42:15+5:30

गेल्या वीस वर्षांचा इतिहास पाहिला तर, या दोन दशकात 4 दोषी व्यक्तींना फाशीवर लटकविले.

Nirbhaya Case Death Warrent From 1991 To Till Now 16 Convicted Hanged To Death In India | देशात 1991पासून आतापर्यंत 16 दोषींना फाशीची शिक्षा; निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना 22 जानेवारीला होणार फाशी

देशात 1991पासून आतापर्यंत 16 दोषींना फाशीची शिक्षा; निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना 22 जानेवारीला होणार फाशी

googlenewsNext

नवी दिल्ली : डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत एका धावत्या बसमध्ये ‘निर्भया’ या तरुणीवर पाशवी बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या चारही सिद्धदोष गुन्हेगारांच्या बहुप्रतीक्षित फाशीसाठी येत्या 22 जानेवारीचा दिवस मंगळवारी ठरविण्यात आला आहे. देशात गेल्या तीन दशकात फाशीचा इतिहास पाहिला तर 1991पासून आत्तापर्यंत 16 दोषींना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. यामध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार-हत्येतील दोषी धनंजय चॅटर्जी ते याकूब मेमन आणि अफजल गुरु या सर्वांचा समावेश आहे.

आकडेवारीच्या माहितीनुसार, जर फक्त गेल्या वीस वर्षांचा इतिहास पाहिला तर, या दोन दशकात 4 दोषी व्यक्तींना फाशावर लटकविले. यामध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार-हत्येतील दोषी धनंजय चॅटर्जी होता. बाकी तीन गुन्हेगार दहशतवाद्यांशी संबंधित होते. धनंजय चॅटर्जीला 14 ऑगस्ट 2001 मध्ये कोलकातातील अलीपूर तुरंगात फाशी देण्यात आली होती. त्याला फाशीवर लटकविण्यासाठी 14 वर्षांचा काळ लागला होता. 5 मार्च 1990 साली त्यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप झाला होता, त्यात त्याला दोषी ठरविण्यात आले होते.

यानंतर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी अजमल कसाबला 21 नोव्हेंबर 2012 साली पुण्यातील येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. अजमल कसाबने 26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत हल्ला करून अनेक लोकांची हत्या केली होती. अजमल कसाब मुळचा पाकिस्तानी होता. त्याला फासावर लटकविण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. अजमल कसाब नंतर संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुला फाशी देण्यात आली होती. 13 डिसेंबर 2001मध्ये संसदेवरील हल्लाचा मास्टरमांइड अफजल गुरु होता.

अफजल गुरुला फाशीवर लटकविण्यासाठी 11 वर्षे लागली. 9 फेब्रुवारी 2013 मध्ये अफजल गुरुला दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. अफजल गुरु यांच्यानंतर तिहार जेलमध्ये आतापर्यंत कोणत्याही दोषीला फाशी देण्यात आली नाही. मात्र, आता निर्भयावर पाशवी बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या चार गुन्हेगारांना येत्या 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे. 30 जुलै 2015 मध्ये नागपूर सेंट्रल जेलमध्ये याकूब मेमनला फाशी देण्यात आली होती. याकूब मेमनवर 1993मध्ये मुंबईत सीरियल बॉम्बस्फोट केल्याचा आरोप होता. त्याला फाशी देण्यासाठी 22 वर्षे लागली होती.   

दरम्यान, काल निर्भयावर पाशवी बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या चारही सिद्धदोष गुन्हेगारांच्या बहुप्रतीक्षित फाशीसाठी येत्या 22 जानेवारीचा दिवस मंगळवारी ठरविण्यात आला आहे. हा मूळ खटला जेथे चालला होता, त्या पतियाळा हाउस न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांनी मुकेश (31 वर्षे), पवन गुप्ता (24), विनय शर्मा (25) आणि अक्षय कुमार सिंग (33) या चौघांविरुद्ध फाशीसाठीचे ‘डेथ वॉरंट’ जारी केले. त्यानुसार येत्या 22 जानेवारीस सकाळी 7 वाजता तिहार कारागृहात त्यांना फाशी दिले जाईल. 

डेथ वॉरंट काढले, तेव्हा चौघेही गुन्हेगार न्यायालयात हजर नव्हते. ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे तुरुंगात त्यांना याची माहिती देण्यात आली. या डेथ वॉरंटविरुद्ध कायदेशीर दाद मागायची असल्यास पुढील 14 दिवसांत तुम्ही ती मागू शकता, असे न्यायाधीश अरोरा यांनी चौघाही गुन्हेगारांना सांगितले.

(‘निर्भया’च्या चारही खुन्यांना २२ जानेवारीस होणार फाशी)

(फाशीचे तख्त तयार; निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकाच वेळी फासावर लटकवणार)

Web Title: Nirbhaya Case Death Warrent From 1991 To Till Now 16 Convicted Hanged To Death In India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.