Nirbhaya Case : 'निर्भया'चे दोषी फासावर लटकल्यानंतर अरविंद केजरीवालांचा मोठा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 09:11 AM2020-03-20T09:11:51+5:302020-03-20T09:30:52+5:30
Nirbhaya Case : 'दुसरी निर्भया होऊ नये म्हणून आपण कठोर प्रयत्न केले पाहिजेत.'
नवी दिल्ली - निर्भयाच्या सहा पैकी चार दोषींना शुक्रवारी (20 मार्च) अखेर फासावर लटकविण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला आहे. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांनी संकल्प करा की भविष्यात दुसरी निर्भया होऊ नये असं म्हटलं आहे. केजरीवाल यांनी पोलीस आणि न्यायालयीन व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरतांवरही भाष्य केले असून यामध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली आहे.
'देशात दुसरी निर्भया होऊ देऊ नये यासाठी आपल्याला संकल्प करण्याची गरज आहे. आपल्याला सर्व व्यवस्था नीट करणे आवश्यक आहे. महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दुसरी निर्भया होऊ नये म्हणून आपण कठोर प्रयत्न केले पाहिजेत. न्यायव्यवस्थेत काय त्रुटी आहेत हे यातून दिसून आलं. त्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे' असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
Delhi CM Arvind Kejriwal:It took 7 yrs for justice to be delivered. Today,we've to take a pledge that a similar incident does not happen again. We've seen how the convicts manipulated the law until recently.There are a lot of loopholes in our system, we need to improve the system pic.twitter.com/C5nlrs91k0
— ANI (@ANI) March 20, 2020
संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले. आपल्या मुलीला न्याय मिळाल्यानंतर निर्भयाच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोषींना शिक्षा झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Nirbhaya Case : 'निर्भया आज नक्कीच आनंदी असेल, आम्हाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली'https://t.co/MKJc4zA5xd#NirbhayaVerdict#NirbhayaJustice#NirbhayaNyayDivas
— Lokmat (@MiLOKMAT) March 20, 2020
निर्भयाच्या वडिलांनी 'आज आमचा विजय झाला आहे. दिल्ली पोलीस, समाज आणि प्रसारमाध्यमांमुळे हे शक्य झाले आहे. या क्षणाची आम्ही मागील 7 वर्षांपासून वाट पाहत होतो. आज केवळ आमच्यासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी मोठा दिवस आहे. आजचा दिवस हा न्यायचा दिवस आहे. निर्भया आज नक्कीच आनंदी असेल. आज आम्हाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली' असं म्हटलं आहे. तसेच 'महिलांसंदर्भातील आरोपांमध्ये योग्य नियम बनवले पाहिजेत. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबियांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागणार नाही' अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
निर्भया बलात्कार प्रकरण : चारवेळा डेथ वॉरंट निघालेला देशातील एकमेव खटला https://t.co/zSM474TaPK
— Lokmat (@MiLOKMAT) March 20, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Nirbhaya Case : 'निर्भया आज नक्कीच आनंदी असेल, आम्हाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली'
Nirbhaya Case: शेवटच्या अर्ध्या तासात काय घडले? दोषी रडले, गडागडा लोळले, मग फासावर चढले
Nirbhaya Case: अखेर ‘तुला’ न्याय मिळाला; मुलीचा फोटो मिठीत घेत आई झाली भावूक, म्हणाली...
Nirbhaya Case:‘...तर भयंकर कृत्य करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा ‘हाच’ एकमेव पर्याय’
अखेर न्याय झाला! निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे तिहार कारागृहात फाशी
निर्भया बलात्कार प्रकरण : चारवेळा डेथ वॉरंट निघालेला देशातील एकमेव खटला