Nirbhaya Case : सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींना आली चक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 06:06 PM2020-02-14T18:06:51+5:302020-02-14T18:09:37+5:30
न्या. भानुमती आपला निर्णय वाचून दाखवत असताना त्यांना भोवळ आली.
नवी दिल्ली - निर्भयाच्या गुन्हेगारांना स्वतंत्रपणे फाशी देण्यासंदर्भात याचिकेवर सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. आर. भानुमती अचानक चक्कर आली. निर्भयाच्या चारही दोषींना एकत्र फाशी देण्यासाठी थांबण्याऐवजी स्वतंत्रपणे फाशी देण्यात यावी यासाठी केंद्र सरकारतर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्या. भानुमती आपला निर्णय वाचून दाखवत असताना त्यांना भोवळ आली. काही सेकंदात त्या शुद्धीवर आल्या. मात्र, सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
Nirbhaya Case : नवं डेथ वॉरंट जारी करा! असं म्हणत निर्भयाच्या आईने कोर्टात फोडला टाहो
न्या. भानुमती शुद्धीवर आल्यानंतर सुनावणी पुढे सुरु न ठेवता त्यांना व्हील चेअरवरून वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले. आता या प्रकरणातली सुनावणी पुढच्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, यासाठी दबाव वाढत आहे. त्याच वेळी कायद्याच्या काही पळवाटा शोधून आरोपींचे वकील वेगवेगळ्या बचावात्मक याचिका दाखल करत आहेत.
Nirbhaya Case :...म्हणून निर्भयाच्या दोषीने सर्वोच्च न्यायालयात केली रिट याचिका दाखल
सर्व दोषींच्या दया याचिका फेटाळल्यानंतरही फाशीची तारीख आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. निर्भया प्रकरणातील एक दोषी विनय शर्मा याची याचिका याआधी काही वेळ फेटाळण्यात आली होती. आता सोमवारपर्यंत या प्रकरणाची सुनावणी थांबवण्यात आली आहे.
#UPDATE Justice R Banumathi was taken into the chamber immediately after she fainted during the hearing in 2012 Delhi gang-rape case in Supreme Court today. The bench has adjourned the case and says the order will be released later. https://t.co/0xLTTg47yG
— ANI (@ANI) February 14, 2020