निर्भयाच्या आई-वडिलांच्या आशा पल्लवीत; राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 02:25 AM2019-12-07T02:25:36+5:302019-12-07T02:25:47+5:30

तिहार तुरुंगाच्या सूत्रांनुसार निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी सुरू झाली आहे.

Nirbhaya parents' hopes fade; President Kovind hint | निर्भयाच्या आई-वडिलांच्या आशा पल्लवीत; राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून सूतोवाच

निर्भयाच्या आई-वडिलांच्या आशा पल्लवीत; राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून सूतोवाच

Next

- एस. के. गुप्ता

नवी दिल्ली : देशात बलात्काऱ्यांना दयेची याचिका करण्याची असलेली तरतूद रद्द करण्याचा विचार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोलून दाखवल्यानंतर निर्भयाच्या आई व वडिलांच्या आशा पल्लवीत झाल्या.
निर्भयाचे वडील बद्रीनाथ सिंह म्हणाले की, राष्ट्रपती कोविंद यांनी हे स्पष्ट केले की, तुमच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची दया दाखवली जाणार नाही. निर्भया खटल्यातील चारपैकी तीन दोषी तिहार तुरुंगात आणि एक मंडोली तुरुंगात आहे.
तिहार तुरूंग प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले, राष्ट्रपतींच्या सूतोवाचानंतर निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी खास दोरी आणि फाशी देणाºयाचा शोध घेतला जात आहे. कारण १३ डिसेंबर रोजी निर्भया प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बद्रीनाथ सिंह यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, राष्ट्रपतींच्या भाषणातून हे स्पष्ट झाले की, माझ्या मुलीवर अत्याचार करणाºयांना ते क्षमा करणार नाहीत. दोषींना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यासाठी तिहार प्रशासनाने २९ आॅक्टोबर रोजी सात दिवसांची मुदत दिली होती. ती सहा डिसेंबरला संपली. चारपैकी एक दोषी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली असल्याचे समजते. त्या लोकांनी एवढा भयानक गुन्हा केला आहे की त्याची शिक्षा फक्त फाशीच आहे. त्या दोषींच्या अंतरात्म्यालाही याची जाणीव झाली आहे, असे ते म्हणाले. निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या की, ‘राष्ट्रपतींनी न्याय दिला असून सर्वोच्च न्यायालयात १३ डिसेंबर रोजी न्याय मिळेल.’

फाशीची तयारी सुरू
तिहार तुरुंगाच्या सूत्रांनुसार निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी सुरू झाली आहे. फाशी कोणत्याही सामान्य दोरीने दिली जाणार नाही. कारण साधारण दोरीने डोके धडापासून वेगळे होण्याचा धोका असतो. त्यासाठी विशेष प्रकारची दोरी तयार केली जाते. तिला मेण (वॅक्स) लावून एका ठराविक तापमानापर्यंत तापवले जाते. त्यामुळे फाशी व्यवस्थित बसून डोके धडापासून वेगळे होत नाही. फाशी देण्यासाठी हँगमनचा शोध घेतला जात आहे. तिहार कारागृहात ९ फेब्रुवारी, २०१३ रोजी संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू ला फाशी दिली.

Web Title: Nirbhaya parents' hopes fade; President Kovind hint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.