दिल्लीतील निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशीच, केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळला दयेचा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 05:30 AM2019-12-07T05:30:58+5:302019-12-07T05:35:01+5:30
दोषीने केलेला दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुक्रवारी केली आहे.
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यातील दोषीने केलेला दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुक्रवारी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतीही दयेचा अर्ज अर्ज फेटाळतील, हे उघड झाले आहे.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ विकास पहवा यांनी शुक्रवारी सांगितले की, बलात्कारी तरुणांची फाशीची शिक्षा रद्द होण्याची शक्यता अंधूक आहे. गृह मंत्रालयाने दयेचा अर्ज फेटाळल्याने आता राष्ट्रपती त्यात बदल करण्याची शक्यता कमी आहे.
अॅड. सिद्धार्थ लुथ्रा म्हणाले की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना दयेचा अर्ज करण्याची परवानगी असू नये, असे मत राष्ट्रपतींनी आजच व्यक्त केले आहे. त्यामुळे ते फाशीच्या शिक्षेवरच शिक्कामोर्तब करण्याचीच शक्यता आहे.