Nirbhaya Case : दोषींना फाशी देताना जल्लादच बेशुद्ध झाला तर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 02:08 PM2020-01-16T14:08:42+5:302020-01-16T14:14:00+5:30

Nirbhaya Case : पवन जल्लाद हे तिहार तुरुंगात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी देणार आहेत.

nirbhya hanging what will happen if executioner was unconscious | Nirbhaya Case : दोषींना फाशी देताना जल्लादच बेशुद्ध झाला तर ?

Nirbhaya Case : दोषींना फाशी देताना जल्लादच बेशुद्ध झाला तर ?

googlenewsNext
ठळक मुद्देपवन जल्लाद हे तिहार तुरुंगात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी देणार आहेत. चारही दोषींना फाशी देण्यापूर्वी प्रत्येक शंका समजून घेतली जात आहे आणि त्यावर चर्चा होत आहे.जल्लाद बेशुद्ध झाल्यास तुरुंगातील कर्मचाऱ्याद्वारे दोषींना फासावर लटकवलं जाईल.

नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टाने ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यातील मुकेश सिंग या चारपैकी एका खुन्याने  22 जानेवारीस फासावर लटकविण्यासाठी जारी केलेल्या डेथ वॉरन्टला स्थगिती देण्यासाठीची याचिका बुधवारी फेटाळली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका व्यक्तीला वारसा म्हणून 'जल्लाद'चे काम मिळाले आहे. पवन जल्लाद हे तिहार तुरुंगात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी देणार आहेत. 22 जानेवारीला सकाळी सात वाजता या चौघांना फासावर लटकवले जाणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरू आहे. मात्र दोषींना फाशी देताना जल्लादच बेशुद्ध झाला तर काय होईल? या शंकेमुळे तिहार जेलमध्ये पर्यायी तयारी सुरू करण्यात आली आहे. 

दिल्ली सरकारनंतर उपराज्यपालांनीही दया याचिका फेटाळली; आता राष्ट्रपती देणार अंतिम निर्णय 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जल्लाद बेशुद्ध होईल याची शक्यता अत्यंत कमी आहे. फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेशातील मेरठहून पवन जल्लाद यांना बोलावण्यात आलं आहे. पवन यांच्यासाठीही फाशी देण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. आतापर्यंत त्यांनी फाशी देण्यात आजोबांची मदत केली आहे. त्यामुळे फाशी देताना जल्लादचे पाय थरुथरू नये या शंकेकडेही दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. त्यामुळेच प्रशासनाने याबाबत पर्यायी तयारी केली आहे.

High court denies suspension of

चारही दोषींना फाशी देण्यापूर्वी प्रत्येक शंका समजून घेतली जात आहे आणि त्यावर चर्चा होत आहे. याचमुळे चार वेळा चाचणीही करण्यात आली आणि जल्लादला दोन दिवस आधीच बोलावण्यात येणार आहे. जेणेकरुन तयारीत कोणतीही कसर राहू नये. फाशी देताना जल्लाद बेशुद्ध झाल्यास तुरुंगातील कर्मचाऱ्याद्वारे दोषींना फासावर लटकवलं जाईल अशी माहिती जेलमधील सूत्रांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

जेलमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या प्रकारची तयारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरूला फाशी देताना कोणताही जल्लाद बोलावण्यात आला नव्हता. जेलमधील कर्मचाऱ्याने अफजल गुरूला फासावर लटकवलं होतं. त्यामुळे दोषीला फाशी देताना जल्लादच पाहिजे असा कोणताही नियम नाही.' तसेच चारही आरोपींना 22 जानेवारीला सकाळी सात वाजता फाशी दिली जाईल. याआधी 21 जानेवारीला डमी किंवा वाळूने भरलेलं वजन लटकवून चाचणी घेतली जाणार आहे. 22 जानेवारीच्या आधी एकूण तीन चाचण्या होणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या 

इंदिरा गांधी आणि करीम लालाच्या भेटीबाबतचे विधान संजय राऊत यांच्याकडून मागे 

...अन् उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंना म्हणाले, घड्याळवाले आमचे पार्टनर

काय सांगता? महिन्याला फक्त 6 हजार पगार, आयकर विभागाने पाठवली तब्बल 3.49 कोटींची नोटीस

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांचं निलंबन

Web Title: nirbhya hanging what will happen if executioner was unconscious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.