Atmanirbhar Bharat Abhiyan : शिक्षण हायटेक होणार; प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:22 PM2020-05-17T13:22:58+5:302020-05-17T13:34:11+5:30
Atmanirbhar Bharat Abhiyan : शिक्षण क्षेत्रातील उपाय योजनाबद्दल यामध्ये महिती देण्यात आली असून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - देशावर आलेलं कोरोनाचं हे एक संकट आणि आव्हान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संधी आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं. रविवारी (17 मे) सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली असून यामध्ये पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या पॅकेजचा अखेरचा टप्पा घोषित करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील उपाय योजनाबद्दल यामध्ये महिती देण्यात आली असून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मल्टीमोड अॅक्सेस डिजिटल/ऑनलाईनच्या माध्यमातून पंतप्रधान ई विद्या योजनेची सुरुवात केली जाणार आहे. तसेच या अंतर्गत अनेक कोर्स, शैक्षणिक चॅनल, कम्युनिटी रेडिओ, ई कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत.
शिक्षकांचे LIVE वर्ग चॅनेलवर दाखवणार आहोत, टाटास्काय व एअरटेलही शैक्षणिक व्हिडीओ दाखवतील, ई-पाठशालांतर्गत 200 नवी पुस्तके आणली. विद्यार्थ्यांसाठी 12 ऑनलाईन चॅनेल सुरू करणार आहोत अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. तसेच चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे 12 वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. तसेच पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार आहेत. देशातील टॉप 100 विद्यापीठांना ऑनलाईन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे. दिव्यांगांनाही ऑनलाईन वर्ग घेता यावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Technology-driven education to be the focus- PM eVIDYa programme for multi-mode access to digital/online education to be launched immediately. Top 100 universities will be permitted to automatically start online courses by 30th May 2020: FM pic.twitter.com/1gVywcaSi6
— ANI (@ANI) May 17, 2020
20 कोटी जनधन खात्यात 10 हजार 25 कोटी जमा केले आहेत तर 8.19 कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये दिलेत. त्याचसोबत 1405 कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहेत. गरीबांना जेवण दिलं जात आहे. तसंच कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांनाही मदत केली जात आहे. 2.2 कोटी बांधकाम मजुरांसाठी 3 हजार 950 कोटी देण्यात आले आहेत. 6.81 कोटी जनतेला उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस सिलेंडर दिलेत. 12 लाख ईपीएफओ धारकांना आगाऊ रक्कम ऑनलाइन काढता आली अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
#WATCH Finance Minister Nirmala Sitharaman announces the last tranche of #EconomicPackagehttps://t.co/doq5YvOydo
— ANI (@ANI) May 17, 2020
राज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या जिल्ह्यात, राज्यात पोहचवण्यासाठी श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मजुरांना स्थानकांवर आणण्याची विनंती राज्यांना करण्यात आली. केंद्र सरकारने 85 टक्के खर्च उचलला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लोकांना थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, गेल्या काही वर्षांतील उपक्रमामुळे आम्हाला हे करणं शक्य झाले आहे. कोरोना संकटकाळात 15 हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. राज्यांना 4113 कोटी रुपये तर आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच पुरवण्यात आलं आहे. प्रवासी मजुरांना घरी पोहचल्यानंतर काम देण्यात येईल असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आशेचा किरण! जगभरात आठ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू; WHOची दिलासादायक माहिती
CoronaVirus News : बापमाणूस! रणरणत्या उन्हात चिमुकल्यांसाठी तो झाला 'श्रावणबाळ'
फक्त एक कप चहाने अनेकांचं आयुष्य वाचवलं; जाणून घ्या 'त्या' दिवशी नेमकं काय झालं?
चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव
पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारी
धक्कादायक! IASच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट; उडाली खळबळ
पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णय