पीएनबी घोटाळा लपवण्यासाठी नीरवनं नेमकं काय काय केलं? वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 01:59 AM2019-12-31T01:59:41+5:302019-12-31T06:47:35+5:30

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील महत्त्वपूर्ण माहिती सीबीआयच्या तपासातून समोर

Nirvana changes companies to hide PNB scam | पीएनबी घोटाळा लपवण्यासाठी नीरवनं नेमकं काय काय केलं? वाचून चक्रावून जाल

पीएनबी घोटाळा लपवण्यासाठी नीरवनं नेमकं काय काय केलं? वाचून चक्रावून जाल

Next

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) १३,४00 कोटी रुपयांचा महाघोटाळा करणारा आरोपी तथा कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी याने आपला गुन्हा लपविण्यासाठी आपल्या तीन कंपन्यांची भागीदारी रचना बदलली होती, अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली.

सूत्रांनी सांगितले की, याच तीन कंपन्यांनी ‘लेटर्स ऑफ अंडरटेकिंग’च्या (एलओयू) माध्यमातून पीएनबीकडून ६,४९८ कोटी रुपये हडपले आहेत. जानेवारी २0१६ मध्ये नीरव मोदीने या कंपन्यांची भागीदारी रचना बदलली.

नीरव मोदी याने डायमंड आर यूएस, सोलार एक्स्पोर्टस् आणि स्टेलर डायमंडस् या तीन कंपन्यांत डमी भागीदारांना बहुतांश भागधारक दाखविले. या बदलांची माहिती त्याने पीएनबीला दिली नाही. या कंपन्यांच्या नावे सुरत को-आॅपरेटिव्ह बँकेत त्याने नवी चालू खातीही काढली. ही खाती काढताना बहुतांश भागधारक म्हणून त्याने डमी संचालक दाखविले.

या तिन्ही संस्था नीरव मोदी याच्या कुटुंबियांच्या मालकीच्या आहेत. त्यावर त्याचे स्वत:चे तसेच त्याच्या पत्नीचे नियंत्रण आहे. आपला घोटाळा लपविण्यासाठी त्याने जानेवारी २0१६ मध्ये प्रत्येक कंपनीत दोन डमी व्यक्ती भागीदार म्हणून दाखविल्या. भागीदारीचे करारपत्र स्वाक्षरित करून घेतले. या नव्या परंतु डमी भागीदारांना त्याने कंपन्यांतील बहुतांंश भागधारक म्हणून दाखविले. या तीन कंपन्यांच्या नावे १५0 बनावट एलओयू जारी करून नीरव मोदीने पीएनबी बँकेतून ६,४९८ कोटी रुपये उचलले. एक पैसाही नंतर त्याने बँकेत भरला नाही.

Web Title: Nirvana changes companies to hide PNB scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.