नोटाबंदीने अर्थव्यवस्थेला आकार : नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन ; डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:12 AM2017-11-14T01:12:15+5:302017-11-14T01:12:41+5:30
नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चित आकार देणे शक्य झाले, असे सांगतानाच, जीएसटी व अन्य आर्थिक सुधारणांमुळे भारतात गुंतवणुकीची दारे अधिक खुली झाली आहेत आणि त्यामुळे भारताचा चेहरामोहरा बदलणार आहे
मनिला : नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चित आकार देणे शक्य झाले, असे सांगतानाच, जीएसटी व अन्य आर्थिक सुधारणांमुळे भारतात गुंतवणुकीची दारे अधिक खुली झाली आहेत आणि त्यामुळे भारताचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
एशियन परिषदेच्या निमित्ताने येथे आलेल्या मोदी यांनी भारतीय समुदायाचीही संवाद साधला. ते म्हणाले की, २१वे शतक भारताचे व्हावे, यासाठी केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशांत असलेल्या भारतीयांनीही मेहनत करणे गरजेचे आहे. एशियनमुळे संबंधित राष्ट्रांशी आर्थिक व औद्योगिक संबंध अधिक बळकट होण्यास मदत होणार असून, त्या सर्वांमध्ये परदेशांतील भारतीयांनीही आपले योगदान द्यावे.
मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. एशियायी देशांच्या शिखर परिषदेनिमित्त उभय नेते येथे आलेले आहेत. व्यूहरचनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला इंडो-पॅसिफिक विभाग खुला आणि समावेशक ठेवण्यासाठी, भारत, अमेरिका, जपान आणि आॅस्ट्रेलियाच्या अधिकाºयांनी प्राथमिक बोलणी केल्यानंतर मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. त्यांच्यात विभागातील सुरक्षेच्या परिस्थितीसह आपापसातील द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या वाढत्या अरेरावीच्या पार्श्वभूमीवर या चार देशांची आघाडी स्थापन करण्याचा विचार झाला. ट्रम्प यांनी केलेल्या ‘इंडो-पॅसिफिक’ या शब्दप्रयोगाने अमेरिका चीनच्या वाढत्या अरेरावीला शह देण्यासाठी भारत, अमेरिका, जपान व आॅस्ट्रेलियाची आघाडी पुन्हा जिवंत करण्याच्या प्रयत्नांत असल्याच्या चर्चांना तोंड फुटले. (वृत्तसंस्था)
भारताचे आणि पंतप्रधानांचे केले कौतुक
ट्रम्प यांनी भारताने त्याच्या अर्थव्यवस्थेला मोकळे केल्यानंतर केलेल्या विस्मयकारक प्रगतीची आणि नरेंद्र मोदी यांची शनिवारी प्रशंसा केली होती.
मोदी हे अवाढव्य भारत देश आणि त्याच्या लोकांना एक करण्यासाठी यशस्वीपणे काम करीत आहेत, असेही ते म्हणाले होते.
एक अब्ज लोकसंख्येच्या भारतातील सार्वभौम आणि जगातील सगळ््यात मोठ्या लोकशाहीचेही त्यांनी कौतुक केले होते.