कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 07:05 PM2021-04-15T19:05:52+5:302021-04-15T19:08:07+5:30
kumbh mela: मध्य प्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे करोना संसर्गामुळे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.
हरिद्वार: एकीकडे संपूर्ण देशभरात कोरोनाचा उद्रेक होत असताना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले गेले होते. मात्र, कोरोनाचा कुंभमेळ्यातही शिरकाव होऊन शेकडो भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मात्र, हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात मध्य प्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे करोना संसर्गामुळे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. (nirvani akhada mahamandaleshwar kapil dev who participated in kumbh mela passed away due to corona)
हरिद्वारमध्ये आयोजित कुंभमेळ्यात गेल्या ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्या आता आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा
महामंडलेश्वर कपिल देव यांचे निधन
मध्य प्रदेशमधील निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव हरिद्वार येथील कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, महामंडलेश्वर कपिल देव हे कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही
गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही. कारण गंगा नदी अविरतपणे वाहत असते. गंगा मातेचे आशीर्वाद घेऊन कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जावे, असा अजब दावा तीरथ सिंह रावत यांनी केला आहे. तसेच कुंभमेळ्याची तुलना मरकजशी करू नये. असे करणे चुकीचे आहे, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी म्हटले आहे.
धक्कादायक! ५ हजारांपैकी केवळ २०० मुंबईचे डबेवाले कार्यरत; कोरोनातील भीषण वास्तव
दरम्यान, हरिद्वारमधील गंगेच्या काठावर होत असलेल्या कुंभमेळ्यात पहिल्या दोन शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हरिद्वारमध्ये मंगळवारी ५९४ म्हणजे जवळपास ६०० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी हरिद्वारमध्ये ४०८ रुग्ण आढळले होते. सध्या हरिद्वारमध्ये २ हजार ८१२ रुग्ण उपचार घेत आहेत.