चिमुकलीला आगीतून वाचवणाऱ्या निशाला बालशौर्य पुरस्कार

By admin | Published: January 18, 2017 06:43 AM2017-01-18T06:43:56+5:302017-01-18T06:43:56+5:30

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

Nishala Dilshala Balshowdhury award from firefighter from Chinmokal | चिमुकलीला आगीतून वाचवणाऱ्या निशाला बालशौर्य पुरस्कार

चिमुकलीला आगीतून वाचवणाऱ्या निशाला बालशौर्य पुरस्कार

Next


नवी दिल्ली : पेटत्या घरातून एका चिमुकलीचा जीव वाचविणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील २५ बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील निशाचा समावेश आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्ष गीता सिद्धार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ जानेवारी रोजी या शूर बालकांना गौरविण्यात येणार आहे.
१४ जानेवारी २०१५ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास निशा पाटील आपल्या मैत्रिणीकडे आली असता शेजारच्या घरातून धूर निघत असल्याचे तिने पाहिले. समोर घराला आग लागली आणि घरात लहान मुलगी असल्याचे कळताच निशाने त्या चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी घरात उडी घेतली. घराच्या छताला आग लागलेली, पडद्यांनीही पेट घेतल्याने ज्या पाळण्यात लहानगी झोपली होती तो पाळणाही जळून तुटला होता. पाळण्यातली लहानगी पूर्वी देशमुख जिवाच्या आकांताने रडत होती हे चित्र पाहून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता निशाने लहानग्या पूर्वीला आगीतून बाहेर काढत तिचे प्राण वाचवले. मोठया मुलाला शाळेत पोहचविण्यासाठी गेलेली पूर्वीची आई, कौशल्या देशमुख परत आली तेव्हा घराला लागलेली आग आणि त्यातून सुखरूप बाहेर दिसलेली आपली लहानगी पाहून तिने निशाचे कोटी कोटी आभार मानले.
निशा ही भडगाव येथील आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीत शिकत आहे. ८ व्या वर्गात हिंदीच्या पुस्तकात ‘साहसी बालक’ या धडयातून तिला साहसीकृत्याची प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते. १२ मुली आणि १३ मुलं अशा एकूण २५ बालकांना वर्ष २०१६ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. यामध्ये ४ बालकांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षणात आर्थिक मदत दिली जाते. वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.
>पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान
निशाच्या या साहसी कार्याबद्दल पंचक्रोशीत तिचे कौतुक होत आहे. तिच्या साहसाची नोंद घेत देशातील सर्वोच्च बाल शौर्य पुरस्काराने तिचा पंतप्रधानांच्या हस्ते तिचा सन्मान होणार आहे. २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या पथसंचलनातही
ती सहभागी होणार आहे.

Web Title: Nishala Dilshala Balshowdhury award from firefighter from Chinmokal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.