नशिराबादचा पाणी प्रश्न मंत्रालयात धाव ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची भेट; वाघूरच्या पाण्याची मागणी

By admin | Published: February 5, 2016 12:32 AM2016-02-05T00:32:57+5:302016-02-05T00:32:57+5:30

नशिराबाद : येथील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी व तात्पुरता एमआयडीसीचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी मंत्रालयात धाव घेऊन पाणीप्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबत लवकरच तोडगा निघणार असून आठवडाभरात एमआयडीसचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

Nishirabad water question: Gram Panchayat office bearers meet in Mantralaya; Waghoor's water demand | नशिराबादचा पाणी प्रश्न मंत्रालयात धाव ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची भेट; वाघूरच्या पाण्याची मागणी

नशिराबादचा पाणी प्रश्न मंत्रालयात धाव ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची भेट; वाघूरच्या पाण्याची मागणी

Next
िराबाद : येथील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी व तात्पुरता एमआयडीसीचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी मंत्रालयात धाव घेऊन पाणीप्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबत लवकरच तोडगा निघणार असून आठवडाभरात एमआयडीसचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. कायमस्वरूपी पाणी योजनाच कार्यान्वित नसल्याने दरवर्षी पाण्यासाठी वणवण आहे. सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहे. पर्यायी योजनाच नसल्याने जळगाव एमआयडीसीकडून होणार्‍या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच एमआयडीसीचे ४ कोटी ९५ लाख ३८ हजार ८३५ रुपये थकीत बाकी ग्रामपंचायतीने भरली नसल्याने एमआयडीसीने पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सरपंच खिलचंद रोटे, उपसरपंच कीर्तीकांत चौबे, ग्रामपंचायत सदस्य- लालचंद पाटील, योगेश पाटील आदी शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावरून महसूलमंत्री खडसे यांनी एमआयडीसी विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावरून पाणीप्रश्न सुटण्याबाबत संकेत मिळाले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. ८ ते १० दिवसातच पाणीप्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी नशिराबाद येथील पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली व वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून पाच कि.मी. अंतरावरील निमगाव जवळील सी.आर. गेटमधून पाणी सोडावे अशी मागणी केली. जलसंपदामंत्री महाजन यांनी जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत चर्चा केली. नशिराबादची पाणी योजना वाघूर नदीवरूनच असल्याने पाणी मिळावे, असा आग्रह ग्रामपंचायतीने केला आहे. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सहमती दर्शविली असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.

Web Title: Nishirabad water question: Gram Panchayat office bearers meet in Mantralaya; Waghoor's water demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.