नीता अंबानींनी महिलांसाठी लॉन्च केलं डिजिटल प्लॅटफॉर्म 'Her Circle'; जाणून घ्या आहे तरी काय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 08:36 PM2021-03-07T20:36:50+5:302021-03-07T20:45:24+5:30

Nita ambani launches her circle : महिलांचे सबलीकरण आणि जागतिक स्तरावर महिलांच्या उन्नतीसाठी काम करणे हा या प्रकारचा पहिला डिजिटल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे.

Nita ambani launches her circle a digital platform for women | नीता अंबानींनी महिलांसाठी लॉन्च केलं डिजिटल प्लॅटफॉर्म 'Her Circle'; जाणून घ्या आहे तरी काय

नीता अंबानींनी महिलांसाठी लॉन्च केलं डिजिटल प्लॅटफॉर्म 'Her Circle'; जाणून घ्या आहे तरी काय

Next

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने (International Womens Day) रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांनी महिला सबलीकरणाच्या उद्देशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'हर सर्कल' (Nita ambani launches her circle ) सुरू केले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, '''हर सर्कल ' खास महिला संबंधित गोष्टींसाठी तयार केले गेले आहे. महिलांचे सबलीकरण आणि जागतिक स्तरावर महिलांच्या उन्नतीसाठी काम करणे  या प्रकारचा हा पहिला डिजिटल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. 'हर सर्कल' प्लॅटफॉर्म महिलांचा सहभाग, नेटवर्किंग आणि परस्पर समर्थन यासाठी सुरक्षित माध्यम प्रदान करेल.

जेव्हा महिला स्वतःवर विश्वास ठेवतात, तेव्हा अविश्वसनीय गोष्टी घडतात. मी आयुष्यभर मजबूत महिलांनी वेढलेले आहे. ज्यांकडून मी दया, लवचिकता आणि सकारात्मकता शिकले आहे; आणि त्या बदल्यात मी इतरांनाही तेच शिकवण्याचा प्रयत्न केला. मी ११ मुलींच्या कुटुंबात वाढले, जिथे मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिकवले गेले. "

वाढलेलं वजन घटवण्यासाठी नीता अंबानींनी केले 'हे' २ उपाय; तुमच्यासाठीही ठरतील प्रभावी

पुढे त्यांनी सांगितले की, ''मला आनंद आहे की आम्ही हर सर्कलच्या माध्यमातून कोट्यवधी महिलांचे समर्थन आणि एकता वृद्धिंगत करू शकतो, ज्यामध्ये प्रत्येक स्त्रीचे स्वागत होईल. 24x7 ग्लोबल नेटवर्किंग, डिजिटल क्रांती आणि प्रत्येकाच्या मदतीने 'हर सर्कल' सर्व संस्कृती, समुदाय आणि देशांच्या महिलांच्या कल्पना आणि उपक्रमांचे स्वागत करेल. समानता आणि भगिनीभाव हे त्याचे वैशिष्ट्य असेल. "

Mansukh Hiren : हत्या, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे; मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसनं दाखल केला FIR

Her circle डेस्कटॉप आणि मोबाइलसाठी वेबसाइट आहे. हे Google Play Store आणि My Jio App Store वर विनामूल्य उपलब्ध आहे. वापरकर्ते Her circle  विनामूल्य नोंदणी करू शकतात. ही वेबसाइट सध्या इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. नंतर ती इतर भारतीय भाषांमध्येही सादर केली जाईल.

Web Title: Nita ambani launches her circle a digital platform for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.