पतीचा मृत्यू, घर चालवण्याचं आव्हान; 'ती' खचली नाही, उभा केला व्यवसाय, अमेरिकेतून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 04:30 PM2023-11-13T16:30:53+5:302023-11-13T16:31:40+5:30

2014 मध्ये नीता दीप बाजपेयी यांच्या पतीचं निधन झालं. यानंतर आर्थिक परिस्थितीही बिकट झाल्यामुळे घर कसं सांभाळायचं असा प्रश्न पडला होता. अशा परिस्थितीत त्यांनी संघर्ष केला.

nita deep bajpai fabric jewellery earrings necklaces demand in america dubai and germany | पतीचा मृत्यू, घर चालवण्याचं आव्हान; 'ती' खचली नाही, उभा केला व्यवसाय, अमेरिकेतून मागणी

पतीचा मृत्यू, घर चालवण्याचं आव्हान; 'ती' खचली नाही, उभा केला व्यवसाय, अमेरिकेतून मागणी

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील रहिवासी असलेल्या नीता दीप बाजपेयी 2014 पासून फॅब्रिक ज्वेलरी, कानातले, बांगड्या, गणपती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती बनवत आहेत. यामुळे त्यांना चांगली कमाई तर होत आहेच पण अमेरिका, दुबई, जर्मनीसह अनेक देशांमध्ये या उत्पादनांना मागणी आहे.

2014 मध्ये नीता दीप बाजपेयी यांच्या पतीचं निधन झालं. यानंतर आर्थिक परिस्थितीही बिकट झाल्यामुळे घर कसं सांभाळायचं असा प्रश्न पडला होता. अशा परिस्थितीत त्यांनी संघर्ष केला आणि कौशल्याच्या जोरावर द्विपांजली आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी सुरू केली. शेणापासून सजावटीच्या वस्तू बनवायला सुरुवात केली. यानंतर अनेक एग्जीबिशन आयोजित करण्यात आली होती. चांगला प्रतिसाद मिळाल्यावर इतर महिलांना स्वावलंबी बनवण्याचा विचार केला, जेणेकरुन ज्या समस्यांना तिला सामोरं जाऊ लागलं त्या समस्या कोणालाही येऊ नये.

300 महिलांना दिला रोजगार

अशा परिस्थितीत नीता मध्य प्रदेशातील विविध गावांमध्ये सर्वेक्षण केलं. प्रत्येक घरात जाऊन महिलांशी चर्चा केली. त्यांना जे काही कौशल्य माहीत होते ते लक्षात घेऊन त्यांना त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे समजावे यासाठी त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यानंतर त्यांना घरी काम देण्यात आले. नीता दीप बाजपेयी यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडे मध्य प्रदेशातील विविध गावांतील 350 महिला काम करत आहेत. या सर्व महिला शेणापासून सजावटीच्या वस्तू बनवतात. दुपट्टे आणि साड्यांवरही ती फॅब्रिक पेंटिंग करतात.

नीता यांनी सांगितलं की, मी आर्ट अँड क्राफ्टमध्ये डिप्लोमा केला आहे. माझ्याकडे एलएलएम पदवी देखील आहे. आज अमेरिका, दुबई, जर्मनी यांसारख्या देशांतील लोक आपण बनवलेले कानातले, हार, बांगड्या विकत घेत आहेत. तसेच या कालावधीत ट्रान्सपोर्ट चार्ज भरावे लागते. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या उत्पादनांची प्रशंसा करत आहेत आणि खरेदीही करत आहेत. आमच्या उत्पादनांची किंमत 10 रुपयांपासून सुरू होते, जी 250 रुपयांपर्यंत जाते. 10 हजार रुपयांपासून हा व्यवसाय सुरू केला. आता वार्षिक उलाढाल 5 लाख रुपये आहे. यासह 300 हून अधिक महिलांना स्वावलंबी बनवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: nita deep bajpai fabric jewellery earrings necklaces demand in america dubai and germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.