हेच राहिलं होतं! 'मी भारतात येताच कोरोना व्हायरस नष्ट होईल', फरार नित्यानंदचा हास्यास्पद दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 01:08 PM2021-06-09T13:08:02+5:302021-06-09T13:10:59+5:30

याआधी जेव्हा कोरोनाची दुसरी लाट खूप वाढली होती तेव्हा त्याने त्याच्या आयलॅंड कैलासावर भारतीयांची एन्ट्री बंद केली होती. 

Nithyananda says his arriaval will end covid in India | हेच राहिलं होतं! 'मी भारतात येताच कोरोना व्हायरस नष्ट होईल', फरार नित्यानंदचा हास्यास्पद दावा

हेच राहिलं होतं! 'मी भारतात येताच कोरोना व्हायरस नष्ट होईल', फरार नित्यानंदचा हास्यास्पद दावा

Next

एकीकडे भारत कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेसोबत लढत आहे आणि दुसरीकडे स्वंयघोषीत फरार साधू नित्यानंदने कोरोनावरून स्वत:बाबत हास्यास्पद दावा केला आहे. नित्यानंदने दावा केला की, जसा तो भारतीय जमिनीवर पाउल ठेवेल, कोरोनाचा अंता होईल. दरम्यान याआधी जेव्हा कोरोनाची दुसरी लाट खूप वाढली होती तेव्हा त्याने त्याच्या आयलॅंड कैलासावर भारतीयांची एन्ट्री बंद केली होती. 

रेपचा आरोपी फरार बाबा नित्यानंद व्हिडीओत आपल्या एका शिष्याला म्हणताना दिसला की, जसा तो भाारतात पाउल ठेवणार कोरोना व्हायरस देश सोडून पळून जाईल.

दरम्यान,  एप्रिल महिन्यात त्याने वक्तव्य केलं होतं की, भारतातून येणाऱ्या भक्तांसाठी सध्या त्याच्य आयलॅंडचे दरवाजे बंद आहेत. याचं कारण त्याने भारतात वाढत असलेल्या कोरोनाच्या केसेस हे दिलं होतं. त्यासोबतच त्याने ही बंदी ब्राझील, यूरोपियन यूनियन आणि मलेशियावरही लावली होती. त्याने काढलेल्या आदेशात म्हटलं होतं की, कैलाशा आयलॅंडच्या सर्व अॅम्बसी सील करण्यात आल्या आहेत. पुढील नोटीस मिळेपर्यंत कुणालाही तिथे एन्ट्री दिली जाणार नाही.

२०१९ मध्ये भारतातून पळून गेल्यावर नित्यानंदने एक आयलॅंड खरेदी केलं आणि त्याचं नाव कैलाशा असं ठेवलं. नित्यानंदवर रेपचा आरोप असून इंटरपोल त्याचा शोध घेत आहे.

नित्यानंदवर गुजरातमध्ये लहान मुलाचं अपहरण करून त्यांना आपल्या आश्रमात ठेवल्याचा आरोप आहे. सोबतच त्याच्यावर रेप आणि लैंगिक त्रासाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातही त्याच्यावर रेप आणि किडनॅपिंगचा गुन्हा दाखल आहे. तसेच फसवणूक आणि पैशांची हेरफेर केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
 

Web Title: Nithyananda says his arriaval will end covid in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.