NITI Aayog Meeting: NITI आयोगाची बैठक; मुख्यमंत्र्यांसोबत 2047 वर चर्चा; PM मोदींनी अनेक मुद्द्यांवर वेधले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 06:05 PM2022-08-07T18:05:31+5:302022-08-07T18:12:39+5:30

NITI Aayog Meeting: बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शहरी प्रशासन, कोविड नंतरची परिस्थिती आणि 2047चे टार्गेट, या विषयांवर चर्चा झाली.

NITI Aayog Meeting: NITI Aayog meeting with Chief Minister, focus on 2047; PM Modi has targeted many issues | NITI Aayog Meeting: NITI आयोगाची बैठक; मुख्यमंत्र्यांसोबत 2047 वर चर्चा; PM मोदींनी अनेक मुद्द्यांवर वेधले लक्ष्य

NITI Aayog Meeting: NITI आयोगाची बैठक; मुख्यमंत्र्यांसोबत 2047 वर चर्चा; PM मोदींनी अनेक मुद्द्यांवर वेधले लक्ष्य

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी कृषी विविधीकरणाचे महत्त्व व्यक्त केले, विशेषत: खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण होण्याची गरज असल्याचे सांगितले. 

2047 वर फोकस
या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शहरी प्रशासन, कोविड नंतरची परिस्थिती आणि 2047 चे लक्ष्य, या विषयांवरही चर्चा झाली. याशिवाय डाळींचे उत्पादन आणि पुढील वर्षी भारतात होणाऱ्या G-20 बैठकीबाबतही या बैठकीत चर्चा झाली आहे. NITI आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की कोविड संकटाच्या काळात भारताची संघराज्य रचना आणि सहकारी संघराज्य संपूर्ण जगासाठी एक मॉडेल म्हणून उदयास आले आहे.

बैठकीत कोण उपस्थित?
जुलै 2019 नंतर परिषदेची ही पहिली बैठक आहे, ज्यामध्ये सर्व सहभागी समोरासमोर आले आहेत. गव्हर्निंग कौन्सिल ही NITI आयोगाची सर्वोच्च संस्था आहे आणि त्यात राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि अनेक केंद्रीय मंत्री असतात. केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, एस जयशंकर तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, मध्य प्रदेश आणि आसामचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.
 

Web Title: NITI Aayog Meeting: NITI Aayog meeting with Chief Minister, focus on 2047; PM Modi has targeted many issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.