"पुढील वर्षापर्यंत मास्क बंधनकारक, कोरोनाची तिसरी लाट नाकारता येत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 12:05 PM2021-09-14T12:05:34+5:302021-09-14T12:06:40+5:30

Coronavirus In India : कोविड प्रोटोकॉलमध्ये मास्क घालणे, सॅनिटायझरने हात धुणे, सोशल डिस्टंसिंग इत्यादींचा समावेश आहे. मास्क घालणे हा संसर्गजन्य रोगांचा सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो.

niti aayog member vk paul warned masks will have to be worn till next year | "पुढील वर्षापर्यंत मास्क बंधनकारक, कोरोनाची तिसरी लाट नाकारता येत नाही"

"पुढील वर्षापर्यंत मास्क बंधनकारक, कोरोनाची तिसरी लाट नाकारता येत नाही"

Next

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus In India)पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल (DR. VK Paul)यांनी भाष्य केले आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती आणि घटती संख्या पाहाता पुढील वर्षापर्यंत मास्क घालावे लागेल. तसेच, कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेला नाकारता येत नाही, असे डॉ. व्ही के पॉल यांनी म्हटले आहे. 

डॉ. व्ही के पॉल म्हणाले की, मास्क परिधान करणे आता बंद होणार नाही. पुढील काही काळासाठी किंवा पुढच्या वर्षांपर्यंत सुद्धा आपल्याला मास्क घालावे लागतील. कारण आ कोरोना विरूद्ध लढा केवळ शिस्त, लस आणि प्रभावी औषधांद्वारे जिंकला जाऊ शकतो. मला विश्वास आहे की या साथीच्या वेळी आपण त्यावर मात करू.

तिसऱ्या लाटेच्या शक्यतेबद्दल विचारले असता, डॉ. पॉल म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट नाकारता येत नाही. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, पॉल म्हणाले,  पुढील तीन-चार महिने खूप महत्वाचे आहेत. आम्हाला स्वतःचे संरक्षण करणे आणि उद्रेक टाळणे आवश्यक आहे. आगामी सणासुदीच्या काळात सुरक्षा कमी करण्याबाबत सावध केले. असे केल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो.

दरम्यान, कोविड प्रोटोकॉलमध्ये मास्क घालणे, सॅनिटायझरने हात धुणे, सोशल डिस्टंसिंग इत्यादींचा समावेश आहे. मास्क घालणे हा संसर्गजन्य रोगांचा सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती. 



 

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस घेतलेल्यांमध्ये दोन महिन्यांनंतर अँटीबॉडीज होतात कमी  
कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccination) मोहीम सुरू आहे. आतापर्यंत नागरिकांना 75 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस युवकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे, परंतु या दरम्यान एका अभ्यासाने (Study on Vaccine) चिंता वाढवली आहे. दरम्यान, ज्या लोकांनी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांच्यामधील अँटीबॉडीजचा स्तर दोन-तीन महिन्यांनी कमी होऊ लागतो, असे आयसीएमआर- प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रला (भुवनेश्वर) आढळले आहे.

Read in English

Web Title: niti aayog member vk paul warned masks will have to be worn till next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.