कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 09:07 PM2020-04-28T21:07:52+5:302020-04-28T22:50:47+5:30

"हाय केस लोड" म्हणून उल्लेख केलेल्या 15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील 2 जिल्हे तर टॉप 7मध्ये आहे.

NITI ayog CEO Amitabh Kant says defeat of corona virus depends on these 15 districts of the country sna | कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे

googlenewsNext
ठळक मुद्देदेशातील तब्बल 15 ठिकाणं आहेत "हाय केस लोड"15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहेमहाराष्ट्रातील दोन जिल्ह्ये देशातील टॉप 7 जिल्ह्यांमध्ये

 
नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत आता कोरोनाने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी तर, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादसह देशातील 15 ठिकाणे ही "हाय केस लोड" असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर कोरोना व्हायरसविरोधात सुरू असलेल्या लढाईतील भारताचे यश, हे याच ठिकाणांवर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.

15 ठिकाणांपैकी 'या' 7 जिल्ह्यांमध्ये आहेत सर्वाधिक कोरोना रुग्ण -  

"हाय केस लोड" म्हणून उल्लेख केलेल्या 15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील 2 जिल्हे तर टॉप 7मध्ये आहे. देशातील या 7 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई, तेलंगाणातील हैदराबाद, गुजरातमधील अहमदाबाद, मध्य प्रदेशातील इंदूर, महाराष्ट्रातील पुणे, राजस्थानातील जयपूर आणि देशाची राजधानी दिल्लीचा समावेश आहे.

CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध

ही 8 ठिकाणं होत चाललीयेत गंभीर -

कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत देशातील 8 ठिकाणं, ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहेत. यात महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचा समावेश आहे. यात, गुजरातमधील वडोदरा, आंध्र प्रदेशातील कुरनूल, मध्य प्रदेशातील भोपाळ, राजस्थानातील जोधपूर, उत्तर प्रदेशातील आग्रा, महाराष्ट्रातील ठाणे, तामिळनाडूतील चेन्नई आणि गुजरातमधील सूरतचा समावेश आहे. 

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

अमिताभ कांत यांनी एक ट्विट करत म्हटले आहे, की "हे 15 जिल्हे आपल्या लढाईत अत्यंत महत्वाचे आहेत. विशेष म्हणजे यातील 7 जिल्ह्यांमध्ये तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोना विरोधातील भारताचे यश याच जिल्ह्यांवर अवलंबून आहे. या जिल्ह्यांवर आपल्याला काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागेल, परिक्षण करावे लागेल आणि उपचार करावे लागतील." 

कोरोनावर मात करण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. कोरोनामुळे देशात 29,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना पसरवणारेच स्वत:ला 'कोरोना वॉरियर्स' म्हणतायेत, 'या' केंद्रीय मंत्र्याचा तबलिगींवर निशाणा

Web Title: NITI ayog CEO Amitabh Kant says defeat of corona virus depends on these 15 districts of the country sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.