नागपूरच्या राष्ट्रीय महामार्गात संरक्षण खात्याचा अडथळा, नितीन गडकरी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 04:17 AM2019-12-06T04:17:58+5:302019-12-06T04:20:01+5:30

राष्ट्रीय महामार्ग किंवा कोणतेही विकास कामे करताना पर्यावरणाच्या नावावर कामांचे अडवणूक होणे योग्य नसल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari accused of obstruction of defense department in Nagpur National Highway | नागपूरच्या राष्ट्रीय महामार्गात संरक्षण खात्याचा अडथळा, नितीन गडकरी यांचा आरोप

नागपूरच्या राष्ट्रीय महामार्गात संरक्षण खात्याचा अडथळा, नितीन गडकरी यांचा आरोप

Next

नवी दिल्ली : नागपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गात संरक्षण विभागाने भूमी संपादनात अडथळे आणल्याने उशिर होत असल्याचा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर नागपूर जिल्ह्यातील कामठीतील संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडथळे आणल्याने महामार्ग पूर्ण होण्यास अडचणी येत असल्याचे गडकरी म्हणाले. संरक्षण विभागाने हस्तक्षेप केल्याने कंत्राटदारांना काम करणे सोपे होत नाही, यामुळे कामाच्या खर्चात वाढ होत असल्याचे गडकरी यांनी निदर्शनास आणून दिले.
राष्ट्रीय महामार्ग किंवा कोणतेही विकास कामे करताना पर्यावरणाच्या नावावर कामांचे अडवणूक होणे योग्य नसल्याचे गडकरी यांनी सांगितले. पर्यावरण संरक्षण व्हावे, या भूमिकेचे आपण पुरस्कार करीत असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की पर्यावरणप्रेमी एकदम काम बंद करा, असा नारा लावतात. हे योग्य नाही. वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर केले पाहिजे. परंतु विकासाच्या कामात अडथळे आणल्यास कामांच्या खर्चात वाढ होते.

Web Title: Nitin Gadkari accused of obstruction of defense department in Nagpur National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.