उज्ज्वल निकम यांच्या घरी आनंदोत्सव विधी क्षेत्रात समाधान : नितीन गडकरी यांनी केले निवासस्थानी अभिनंदन
By admin | Published: January 26, 2016 12:05 AM2016-01-26T00:05:04+5:302016-01-26T00:05:04+5:30
जळगाव : राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाला उधाण आले. त्यांच्या कुटुंबियांनी निकम यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
Next
ज गाव : राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाला उधाण आले. त्यांच्या कुटुंबियांनी निकम यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.गेले अनेक वर्ष राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले ॲड.उज्ज्वल निकम यांच्या कार्याची दखल घेत केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. त्याबाबतची माहिती सोमवारी दुपारी जळगावात समजली. त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती निकम यांनी त्यांचे औक्षण करीत पेढा भरवून अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या आईवडिलांच्या फोटोजवळ जात नमस्कार केला. पुरस्काराची घोषणा झाली त्यावेळी त्यांचे मोठे बंधू दिलीपराव निकम, मोठ्या वहिनी शैलजा निकम, चिरंजीव ॲड.अनिकेत निकम यांच्यासह कुटुंबीय घरी होते. त्यानंतर दुपारी राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिलेचा शुभारंभ करण्यासाठी आलेले केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन ॲड.निकम यांचे अभिनंदन केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार ए.टी.पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, राजेंद्र फडके यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.निकम यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात आनंद व्यक्त करण्यात आला. विधी क्षेत्रातील तज्ज्ञांनी उज्ज्वल निकम यांची निवड म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असल्याची भावना व्यक्त केली.