Nitin Gadkari: “सुरक्षेमध्ये तुम्ही झीरो आहात”; नितीन गडकरींनी दिग्गज कार कंपन्यांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 08:09 PM2021-07-07T20:09:48+5:302021-07-07T20:10:33+5:30

Nitin Gadkari: आता नितीन गडकरींनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून देशातील दिग्गज कार कंपन्यांना चांगलेच सुनावल्याचे सांगितले जात आहे.

nitin gadkari criticised indian carmakers over vehicle safety | Nitin Gadkari: “सुरक्षेमध्ये तुम्ही झीरो आहात”; नितीन गडकरींनी दिग्गज कार कंपन्यांना फटकारले

Nitin Gadkari: “सुरक्षेमध्ये तुम्ही झीरो आहात”; नितीन गडकरींनी दिग्गज कार कंपन्यांना फटकारले

Next

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी चर्चेत आहेत. इंधनदरवाढ तसेच त्याला पर्याय म्हणून इथेनॉलच्या वापराला प्राधान्य देण्यात येणार असून, फ्लेक्स इंजिनाबाबतची योजना तीन महिन्यात आणणार असल्याचे नितीन गडकरी यांनी अलीकडेच सांगितले. यानंतर आता नितीन गडकरींनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून देशातील दिग्गज कार कंपन्यांना चांगलेच सुनावल्याचे सांगितले जात आहे. (nitin gadkari criticised indian carmakers over vehicle safety)

रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहन उत्पादकांनी त्यांची गुणवत्ता व मानके सतत सुधारावीत. तसेच सुरक्षा-गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार वाहन उत्पादकांनी सुधारणा करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना केले. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी कार निर्माता कंपन्यांना फटकारले. याशिवाय ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सवर (ओईएम) कडक शब्दांत टीका केली.

“आता कुणाला काय सीडी लावायची, ती त्यांनी लावावी”; भाजपचा एकनाथ खडसेंना टोला

गुणवत्ता निकृष्ट दर्जाची

भारतीय वाहन उद्योगात ओईएमचा मोठा वाटा आहे, तरीही ते अत्यंत खराब कामगिरी करत आहेत, या शब्दांत कार निर्मात कंपन्यांना सुनावत अपघात कमी करण्यासाठी रस्ते विकासाच्या सर्व टप्प्यांवर सेफ्टी ऑडिट करणे अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. 

गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता

वाहनांच्या पायाभूत सुविधांची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे. वाहन उत्पादकांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आपल्या वाहानांमध्ये सतत सुधारणा करण्याचे आवाहन करतो. सुरक्षेसाठी लागणारा खर्च वाढविला गेला तरीही त्याबाबत तडजोड न करण्याची मोठी जबाबदारी वाहन कंपन्यांवर आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

दरम्यान, कोणत्याही नवीन किंवा आधीपासून बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरू करण्याआधी त्या मार्गाचे सुरक्षा ऑडिट करावे लागणार आहे. या ऑडिटमध्ये संबंधित रस्त्यावर अपघाताची शक्यता आहे की नाही, हे तपासून बघितल्यानंतरच किंवा जोपर्यंत एखादा रस्ता सुरक्षित होत नाही तोपर्यंत त्या रस्त्यावर वाहतूकीची परवानगी नसेल, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: nitin gadkari criticised indian carmakers over vehicle safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.