मनपावर खाविआचेच वर्चस्व सिद्ध भाजपाचा मतदानाचा अ˜ाहास : महापौरपदी नितीन ल‹ा, उपमहापौरपदी ललित कोल्हे ४१ मतांच्या फरकाने विजयी

By admin | Published: March 11, 2016 12:28 AM2016-03-11T00:28:14+5:302016-03-11T00:28:14+5:30

जळगाव : महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपाची राजकीय गणित चुकवीत खाविआने मनसे, राष्ट्रवादी, जनक्रांती, शिवसेनेला सोबत घेत विजय प्राप्त केला. भाजपाने केवळ १५ संख्याबळ असतानाही राजकीय विरोधासाठी माघार न घेता मतदानाचा अ˜ाहास केला. त्यामुळे मतदान होऊन महापौरपदी खाविआचे नितीन ल‹ा तर उपमहापौरपदी मनसेचे ललित कोल्हे ७५ पैकी ५८ मते मिळवून विजयी झाले. तर भाजपाच्या उमेदवारांना मविआ व अपक्षासह १७ मते मिळाली.

Nitin Gadkari, the Deputy Mayor, won the vote of 41 votes by becoming the Chief Minister of Maharashtra. | मनपावर खाविआचेच वर्चस्व सिद्ध भाजपाचा मतदानाचा अ˜ाहास : महापौरपदी नितीन ल‹ा, उपमहापौरपदी ललित कोल्हे ४१ मतांच्या फरकाने विजयी

मनपावर खाविआचेच वर्चस्व सिद्ध भाजपाचा मतदानाचा अ˜ाहास : महापौरपदी नितीन ल‹ा, उपमहापौरपदी ललित कोल्हे ४१ मतांच्या फरकाने विजयी

Next
गाव : महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपाची राजकीय गणित चुकवीत खाविआने मनसे, राष्ट्रवादी, जनक्रांती, शिवसेनेला सोबत घेत विजय प्राप्त केला. भाजपाने केवळ १५ संख्याबळ असतानाही राजकीय विरोधासाठी माघार न घेता मतदानाचा अ˜ाहास केला. त्यामुळे मतदान होऊन महापौरपदी खाविआचे नितीन ल‹ा तर उपमहापौरपदी मनसेचे ललित कोल्हे ७५ पैकी ५८ मते मिळवून विजयी झाले. तर भाजपाच्या उमेदवारांना मविआ व अपक्षासह १७ मते मिळाली.
सकाळी ११ वाजता महापौर व उपमहापौर निवडीसाठीच्या विशेष सभेला प्रारंभ झाला. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल उपस्थित होत्या.
तसेच व्यासपीठावर आयुक्त संजय कापडणीस, प्रांताधिकारी अभिजित भांडे, उपजिल्हाधिकारी साजीद पठाण, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते.
सभेला प्रारंभ होताच उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. महापौरपदासाठी खाविआचे नितीन ल‹ा व वर्षा खडके तर भाजपाच्या ज्योती चव्हाण यांचे अर्ज वैध ठरले. तर उपमहापौरपदासाठी मनसेचे ललित कोल्हे, विजय कोल्हे, व भाजपाचे विजय गेही यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. पीठासीन अधिकार्‍यांनी माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला. त्यानुसार खाविआच्या वर्षा खडके व मनसेचे विजय कोल्हे यांनी डमी अर्ज मागे घेतले. मात्र भाजपाच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज कायम ठेवले.
खाविआतर्फे बिनविरोधचे आवाहन
सभा सुरू होण्यापूर्वीच मावळते उपमहापौर सुनील महाजन तसेच स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी भाजपाचे गटनेते डॉ.अश्विन सोनवणे यांच्या आसनाजवळ जाऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. तसेच माघारीची मुदत सुरू असताना नितीन ल‹ा यांनी भाजपा गटनेत्यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना तसेच उमेदवार ज्योती चव्हाण यांना कटूता टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. मात्र ज्योती चव्हाण यांनी तुम्हाला व्यक्तिगत शुभेच्छा आहेत. मात्र विरोधकाची भूमिका आम्ही चोख पार पाडू. त्यामुळेच माघार घेणार नाही, असे सांगितले.
हात उंचावून झाले मतदान
माघारीची मुदत संपूनही माघार न झाल्याने अखेर दोन्ही पदांसाठी मतदान झाले. पहिले महापौरपदासाठी मतदान घेण्यात आले. त्यात भाजपाच्या ज्योती चव्हाण यांच्या बाजूने किती जणांचे मत आहे? याची विचारणा केल्यावर भाजपाचे १५ सदस्य, मविआचे नरेंद्र पाटील व अपक्ष सदस्य नवनाथ दारकुंडे अशा १७ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. त्याचे व्हीडीओ चित्रीकरण करून लेखी स्वरूपातही मतदान घेण्यात आले. त्यानंतर ल‹ा यांच्यासाठी मतदान घेतले. त्यांना ५८ मते मिळाली.
त्याचप्रमाणे उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे यांना ५८ तर भाजपाचे विजय गेही यांना १७ मते मिळाली.

Web Title: Nitin Gadkari, the Deputy Mayor, won the vote of 41 votes by becoming the Chief Minister of Maharashtra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.