ँँमनपात खाविआ, मनसे, जनक्रांती एकत्र निवडणूक: महापौरपदासाठी नितीन ला, उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 10:02 PM2016-02-29T22:02:09+5:302016-02-29T22:02:09+5:30
जळगाव: मनपात महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना गती आली असून सोमवारी मनसे, भाजपा यांच्या बैठका पार पडल्या. मनसे व जनक्रांतीने स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापतीनिवडणुकीवेळी खाविआसोबत असल्याने या निवडणुकीतही खाविआसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. महापौरपदासाठी नितीन ला तर उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे यांची नावे निित झाली आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज खरेदी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Next
ज गाव: मनपात महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना गती आली असून सोमवारी मनसे, भाजपा यांच्या बैठका पार पडल्या. मनसे व जनक्रांतीने स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापतीनिवडणुकीवेळी खाविआसोबत असल्याने या निवडणुकीतही खाविआसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. महापौरपदासाठी नितीन ला तर उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे यांची नावे निित झाली आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज खरेदी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापौर व उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १९ मार्च रोजी संपत असल्याने तत्पूर्वी नवीन पदाधिकारी निवड केली जाणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता मनपाची विशेष सभा होत आहे. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी असतील. उमेदवारी अर्जांची विक्री मंगळवार १ मार्च ते ४ मार्च दरम्यान होणार असून याच कालावधीत उमेदवारी अर्ज स्विकारलेही जाणार आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना गती आली आहे. मनसेची बैठकमहापौर व उपमहापौर निवडणुकीत खाविआने मनसेला उपमहापौरपद देण्याचे जाहीर केले. त्यावर निर्णय घेण्यासाठी मनसेच्या सर्व नगरसेवकांची बैठक गटनेते ललित कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात याविषयावर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार गटनेता ललित कोल्हे यांना देण्यात आले. त्यांनी स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती निवडणुकीच्यावेळी ज्याप्रमाणे मनसे खाविआसोबत होती, त्यानुसार शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने महापौर व उपमहापौर निवडणुकीतही खाविआसोबतच राहण्याचा निर्णय मनसेने घेतला असल्याचे कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. जनक्रांतीही सोबतजनक्रांतीचे दोन्ही सदस्य सुरूवातीपासूनच खाविआसोबत होते. त्यांनी या निवडणुकीतही खाविआसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खाविआ, मनसे, जनक्रांती अशी युती झाली आहे. इन्फो-मनपातील बलाबलमनपातील एकूण सदस्य-७५(बहुमतासाठी लागणारे संख्याबळ-३८ )खाविआ-३२मनसे १२जनक्रांती-२शिवसेना-१अपक्ष-१एकूण- ४८--------------भाजपा १५राष्ट्रवादी-११ मविआ-१एकूण-२७