डिझेल टॅक्सीवरील बंदी उठवण्यासाठी न्यायालयाला विनंती करणार - नितीन गडकरी
By Admin | Published: May 3, 2016 11:46 AM2016-05-03T11:46:18+5:302016-05-03T11:46:18+5:30
दिल्लीमधील डिझेल टॅक्सीवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 03 - दिल्लीमधील डिझेल टॅक्सीवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. या बंदीमुळे हजारो लोकांवर बेरोजगार होण्याची पाळी येणार आहे. तसंच वाहतुकीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढेल असं नितीन गडकरी बोलले आहेत.
केंद्रीय सरकारने हवा प्रदूषण कमी करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांची माहिती यावेळी न्यायालयात देण्यात येईल असंदेखील गडकरी यांनी सांगितलं आहे. दरम्यान बंदीविरोधात दिल्लीमध्ये गेले 2 दिवस सुरु असलेल्या आंदोलनामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. यामुळे दिल्लीकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.