वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल टॅक्स संदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 04:30 PM2023-04-24T16:30:39+5:302023-04-24T16:31:39+5:30

वाहनधारकांना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दिलासा दिला आहे.

nitin gadkari rules on toll tax if you are travel on highways than you can not pay toll charges | वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल टॅक्स संदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट

वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल टॅक्स संदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट

googlenewsNext

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. महामार्गावरून चालणाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. यासोबतच सरकार आता टोल टॅक्स नियमात मोठा बदल करण्यात येणार आहे, याचा थेट फायदा करोडो वाहनधारकांना होणार आहे. यासोबतच नितीन गडकरी म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस देशभरात २६ ग्रीन एक्स्प्रेस वे बांधले जातील आणि नवीन टोल नियमही जारी केले जातील.

येत्या काही दिवसांत टोल वसुलीसाठी दोन पर्याय देण्याचा सरकार विचार करत आहे. यामध्ये गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवणे हा पहिला पर्याय आहे. तर दुसरी पद्धत आधुनिक नंबर प्लेटशी संबंधित आहे. सध्या त्यासाठी नियोजन सुरू आहे.

संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळांनी मांडले गणित; म्हणाले, “१६ आमदार अपात्र ठरले तरी…”

टोल टॅक्स न भरल्यास कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही. यासोबतच आगामी काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले, आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही, मात्र टोलबाबत विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे. आता थेट तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्स कापला जाईल. त्यासाठी वेगळी कारवाई केली जाणार नाही. आता टोल टॅक्स भरावा लागणार नाही, थेट तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाईल, असं नितीन गडकरींनी सांगितलं. '२०१९ मध्ये आम्ही एक नियम केला होता की, कार कंपनीने फिट केलेल्या नंबर प्लेटसह येतील. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत आलेल्या वाहनांवर वेगवेगळ्या नंबरप्लेट आहेत, असंही गडकरी म्हणाले.
 

Web Title: nitin gadkari rules on toll tax if you are travel on highways than you can not pay toll charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.