आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत प्रथम क्रमांकावर असेल: नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 05:42 PM2021-04-19T17:42:41+5:302021-04-19T17:44:15+5:30

electric vehicle: आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत देश प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

nitin gadkari says that india to become no 1 electric vehicle manufacturer in world | आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत प्रथम क्रमांकावर असेल: नितीन गडकरी

आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत प्रथम क्रमांकावर असेल: नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देइलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत प्रथम क्रमांकावर असेलसर्व नामांकित ब्रँड भारतात - गडकरी

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी शंभरी गाठल्याचे पाहायला मिळाले. तसेच देशातील वाढत्या प्रदुषणाला पर्यायही शोधले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वाहनांना केंद्राकडून प्रोत्साहन दिले जात आहेत. तर, ग्राहकांकडून इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद दिला जात आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत देश प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. (nitin gadkari says that india to become no 1 electric vehicle manufacturer in world)

आगामी सहा महिन्यांमध्ये देशात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीचे उत्पादन सुरू होईल. त्यामुळे आगामी काही काळात भारत इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीच्या बाबतीत पहिल्या स्थानी असेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. ते अमेजन संभव संमेलनात बोलत होते. दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून गडकरी यामध्ये सहभागी झाले होते. 

इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील

इलेक्ट्रिक वाहनांद्वारे परिवहन प्रणाली प्रदूषणमुक्त करता येईल. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होऊ शकतील. तसेच ही वाहने किंमतीच्या बाबतीत पेट्रोल आणि डिझेल वाहनांशी स्पर्धा करू शकतील. भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या स्थानावर पाहायचा आहे. यासाठी सरकार इथेनॉल, मिथेनॉल, बायो-सीएनजी, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकसह तत्सम इंधन इंजिन असलेली वाहने तयार करण्यास उत्पादकांना प्रोत्साहन देत आहे, असे गडकरींनी यावेळी बोलताना नमूद केले. 

Tesla ला भारतात कार बनविण्यात अडचणी? नितीन गडकरींनी दाखवला 'खुश्कीचा' मार्ग

सर्व नामांकित ब्रँड भारतात 

भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात पुढे जात आहे. आगामी काळात या क्षेत्रात देशाचे पहिले स्थान असेल. सध्या सर्व नामांकित ब्रँड भारतात आहेत. एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर चालविण्याची क्षमता असणाऱ्या इंजिनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वाहन उत्पादकांना प्रोत्साहित करू इच्छिते. या संदर्भात उत्पादकांशी वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली. 

दरम्यान, भारतामध्ये हरित ऊर्जा निर्मितीची मोठी क्षमता आहे. सहा महिन्यांत १०० टक्के लिथियम-आयन बॅटरी तयार करण्याच्या स्थितीत असू. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान सुरू करण्याच्या दृष्टीने सरकार काम करत आहे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: nitin gadkari says that india to become no 1 electric vehicle manufacturer in world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.