महामार्ग बनवण्याचा विश्वविक्रम केला, तरी मन भरलं नाही; गडकरींनी सांगितलं त्यांचं टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 06:26 PM2021-08-11T18:26:16+5:302021-08-11T18:28:35+5:30
2020-21 मध्ये महामार्गाच्या बांधकामाचा वेग वाढून दिवसाला 37 किलोमीटर एवढा झाला आहे. (Nitin Gadkari)
नवी दिल्ली - पायाभूत सुविधांचा विकास हा देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि महामार्ग बांधकामात प्रतिदिन 100 किमी एवढा वेग गाठणे हे आपले लक्ष्य आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते बुधवारी इंडस्ट्री बॉडी CII ने आयोजित केलेल्या एका व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलत होते. (Nitin Gadkari says my target is to achieve 100 km per day of highway construction)
रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्रीनितीन गडकरी म्हणाले, "पायाभूत सुविधांचा विकास देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कोरोना महामारीच्या काळातही आम्ही एका दिवसात 38 किमी रस्ता बनवून विश्वविक्रम केला. 2020-21 मध्ये महामार्गाच्या बांधकामाचा वेग वाढून दिवसाला 37 किलोमीटर एवढा झाला आहे.
नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात : राज्यपाल
2020-21 मध्ये महामार्ग बांधनीचा वेग विक्रमी 37 किलोमीटर प्रतिदिन -
गडकरी म्हणाले, ''...पण मी सध्याच्या कामगिरीवर समाधानी नाही. माझे लक्ष रोज 100 किलोमीटर महामार्ग बांधणीचे आहे. एवढेच नाही, तर सरकारचा प्रयत्न कालबद्ध, लक्ष्य केंद्रित, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आहे, असेही गडकरी म्हणाले.
यावेळी, आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडकरींनी प्रकल्पात होणाऱ्या विलंबासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांवरही टीका केली. ते म्हणाले, “मी अधिकाऱ्यांना विचारतो, की जर एखाद्या कंत्राटदाराला आपली बँक अथवा वित्तीय संस्था बदलायची असेल, तर त्याला एनएचएआयकडून एनओसी मिळवण्यासाठी 3 महिने ते 1.5 वर्षांचा कालावधी लागतो. हे आपण 2 तासांत शक्य करू शकतो. मग याला 1.5 वर्षांचा कालावधी का लागते?” एवढेच नाही, तर समस्या अशी आहे, की नोकरशाही व्यवस्थेला वेळेचा अर्थ समजत नाही, असेही गडकरी म्हणाले.
Maharashtra Flood : पूरग्रस्त भागातील रस्ते दुरुस्तीला सुरूवात, गडकरींनी दिले 100 कोटी