आता देशातून पेट्रोल डिझेलला राम-राम ठोकण्याची आली वेळ? केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले...
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 17, 2021 02:15 PM2021-02-17T14:15:12+5:302021-02-17T14:25:11+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी म्हणाले, देशात विजेकडे पर्यायी इंधन म्हणून उत्तेजन दिले जाऊ शकते. येणाऱ्या काळासाठी हा शूभसंकेत आहे.
नवी दिल्ली -पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. अनेक राज्यांमध्ये तर पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपये प्रती लिटरच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र, असे असताना सरकार किमती कमी करण्यावर नाही, तर नव्या पर्यायांवर भाष्य आणि विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी यांनी देशात पर्यायी इंधनावर जोर देत भाष्य केले आहे. आता देशात पर्यायी इंधनाची वेळ आली असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी म्हणाले, देशात विजेकडे पर्यायी इंधन म्हणून उत्तेजन दिले जाऊ शकते. येणाऱ्या काळासाठी हा शूभसंकेत आहे. गडकरी म्हणाले, आपले मंत्रालय पर्यायी ईंधनावर संपूर्ण शक्तीनीशी काम करत आहे. माझा सल्ला आहे, की आता देशात पर्यायी इंधनाची वेळ आली आहे. मी पहिल्यापासूनच, इंधन म्हणून इलेक्ट्रिसिटीला पसंती देण्यासंदर्भात बोलत आहे. कारण आपल्याकडे आवश्यकतेहूनही अधिक वीज आहे.
आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी द्यावी लागणार नाही टेस्ट; सरकार आणतंय नवा नियम
My suggestion is that this is the time for the country to go for alternative fuel. I'm already propagating electricity as a fuel because India has surplus electricity: Union Minister Nitin Gadkari on increasing fuel prices pic.twitter.com/XWJ8VITzmp
— ANI (@ANI) February 16, 2021
भारतात तायार होतायत 81 टक्के लिथियम-आयन बॅटरीज -
गडकरी म्हणाले, देशात आधिपासूनच 81 टक्के लिथियम-आयन बॅटरीज तयार होत आहेत. याच बरोबर हायड्रोजन फ्यूल सेल्स विकसित करण्याचाही प्रयत्न सरकार करत आहे. अशात, आता ईंधनाच्या नव्या पर्यायांची वेळ आली असल्याचे आम्हाला वाटते. लिथियम-आयन बॅटरीच्या क्षेत्रात सध्या चीन सारख्या देशांचा दबदबा आहे. मात्र, भारत सरकारही ईंधनाच्या पर्यायांवर वेगाणे काम करत आहे. तसेच या क्षेत्रात आपला दबदबा निर्मण करण्याचा प्रयत्न करत आहे.
8 लाख कोटी रुपयांच्या जीवाश्म इंधनाची आयात -
देशात सध्या 8 लाख कोटी रुपयांच्या जीवाश्म इंधनाची आयात केली जाते. गडकरी म्हणाले, जागतीक बाजारात जीवाश्म इंधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तसेच भारतात तब्बल 70 टक्के जीवाश्म इंधनाची आयात होते. गडकरी म्हणाले, की "त्यांनी नुकतेच जैव-सीएनजीवर चालणारे ट्रॅक्टर लॉन्च केले आहे. आपल्याला पर्यायी इंधन उद्योगाला वेगाने वाढविण्याची आवश्यकता आहे. तसेच तामिळनाडू हे कृषी क्षेत्रातील एक महत्वाचे राज्य आहे.’’