Nitin Gadkari: पत्नीला न सांगताच सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालविलेला; नितीन गडकरींनी केला गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:51 PM2021-09-16T12:51:17+5:302021-09-16T12:54:31+5:30
Delhi Mumbai Expressway Nitin Gadkari video: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस हायवेसाठी मंत्रालयाचे बजेट केवळ 1 लाख कोटींचे आहे. मात्र, आम्ही 15 लाख कोटींचा रस्ता बनवत आहोत. जर आम्ही गुंतवणूकदारांकडून पैसे घेत असून तर त्यांना तो मागेही द्यावा लागणार आहे, असे गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी दोन मोठ्या शहरांना जोडणारा दिल्ली- मुंबई एक्सप्रेस-वेच्या (Delhi Mumbai Expressway) निर्माण कार्याची पाहणी केली. हरियाणाच्या सोहनामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गडकरी यांनी संबोधित देखील केले. स्पष्टवक्ते असलेल्या गडकरींनी आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. रस्त्याच्या बांधकामात सासऱ्याचे घर आडवे येत होते, तेव्हा त्यांनी काय केले हे सांगितले आहे. (Nitin Gadkari reviews progress of Delhi-Mumbai Expressway.)
नितीन गडकरींनी सांगितले की, तेव्हा माझे नुकतेच लग्न झाले होते. माझ्या सासऱ्यांचे घर रस्त्याच्या मधोमध येत होते. रामटेकमध्ये ते घर होते. तेव्हा मी पत्नीला कोणताही कल्पना न देता सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालविला आणि रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र, यानंतर घरात काय झाले, ते मात्र गडकरींनी सांगितले नाही. हे वक्तव्य 44.7 मिनिटांपासून सुरु होते.
टोलवर नितीन गडकरी यांनी सांगितले की, जर तुम्हाला चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे द्यावे लागतील. लग्न तर खुल्या मैदानात देखील होते, परंतू त्यासाठीही पैसे खर्च करावे लागतात असे उदाहरण त्यांनी दिले. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस हायवेसाठी मंत्रालयाचे बजेट केवळ 1 लाख कोटींचे आहे. मात्र, आम्ही 15 लाख कोटींचा रस्ता बनवत आहोत. जर आम्ही गुंतवणूकदारांकडून पैसे घेत असून तर त्यांना तो मागेही द्यावा लागणार आहे, असे गडकरी म्हणाले.
Interaction with Media, Sohna, Haryana. #PragatiKaHighway#DelhiMumbaiExpresswayhttps://t.co/Kh2SXDPrfd
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 16, 2021
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे वर गुरुग्रामजवळ दोन ते तीन स्मार्ट सीटी बनविल्या जाऊ शकतात. कोणत्याही देशातील रस्ते चांगले असणे गरजेचे आहे. धौलकुआजवळ एक पोलीस ठाणे रस्त्याच्या मध्ये येत आहे. तो तोडून तिथे रस्ता मोठा केला जाऊ शकतो, असे ग़डकरींनी सांगितले. (Bulldozer driven to father-in-law's house without telling wife; Nitin Gadkari told secret.)
शेतकऱ्यांना काय...
नितीन गडकरींनी सांगितले की, मी देखील एक शेतकरी आहे. सरकार आता शेकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जास्त पैसे देत आहे. जे शेतकऱ्यांसाठी चांगले आहे. आम्ही वाहतूक कोंडी, प्रदूषण मुक्ती देण्यासाठी काम करत आहोत. या एक्सप्रेस वेवर ट्रकदेखील विजेवर चालविण्याचे माझे स्वप्न आहे.