नितीन गडकरी आज जळगावात

By admin | Published: January 25, 2016 02:00 AM2016-01-25T02:00:54+5:302016-01-25T02:00:54+5:30

Nitin Gadkari today is in Jalgaon | नितीन गडकरी आज जळगावात

नितीन गडकरी आज जळगावात

Next
>जळगाव, दि.२४ - केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे सोमवार, २५ जानेवारी रोजी जळगाव जिल्‘ाच्या दौर्‍यावर येत असून राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला अनावरण त्यांच्याहस्ते होणार आहे. जिल्‘ातील खासदारांनी मंजूर करून आणलेल्या १६ हजार ५८२ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते यावेळी होईल.
२५ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथून विशेष विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण होईल. दुपारी १२ वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता सागरपार्क येथे जळगाव शहरातील नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला अनावरण सोहळा होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता जैन इरिगेशन सिस्टीम प्रकल्पास भेट देऊन ते दुपारी ४ वाजता जळगाव विमानतळ येथून विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत.

Web Title: Nitin Gadkari today is in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.