डिझेल वाहनांचे उत्पादन कमी करा, पर्यायांवर भर द्या; नितीन गडकरींनी दिल्या कंपन्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:21 PM2021-08-26T22:21:47+5:302021-08-26T22:24:31+5:30

आताच्या घडीला देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत.

nitin gadkari urges carmakers to avoid selling diesel cars and promote alternatives technology | डिझेल वाहनांचे उत्पादन कमी करा, पर्यायांवर भर द्या; नितीन गडकरींनी दिल्या कंपन्यांना सूचना

डिझेल वाहनांचे उत्पादन कमी करा, पर्यायांवर भर द्या; नितीन गडकरींनी दिल्या कंपन्यांना सूचना

Next
ठळक मुद्देऑटोमोबाईल क्षेत्राचा वाटा ७.१ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढला पाहिजेरोजगाराच्या दृष्टीने योगदान ३७ मिलियनवरून ५० मिलियनपर्यंत वाढले पाहिजेदेशाला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात ऑटोमोबाईल उद्योगाची महत्त्वाची भूमिका

नवी दिल्ली: आताच्या घडीला देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. देशातील १७ राज्ये आणि केंद्राशासित प्रदेशात पेट्रोलचा भाव १०० रुपयांच्याही वर गेला आहे. डिझेलची सर्वोच्च किमतीवर आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधनावर भर देण्याचा केंद्र सरकारकडून दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन निर्माता कंपन्यांना डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन आणि विक्री कमी करून पर्यायांवर भर देण्याची सूचना दिली आहे. (nitin gadkari urges carmakers that avoid selling diesel cars and look for alternatives)

ऑटो उद्योगाची संघटना असलेल्या सियामच्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, सरकार फ्लेक्सिबल इंजिनांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे, जे ग्राहकांना १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय देईल, असे गडकरी यांनी नमूद केले. 

“देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

डिझेल वाहनांचे उत्पादन कमी करा

वाहन उत्पादकांना डिझेल इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री कमी करण्याचे आवाहन करतो. डिझेलमुळे होणारे प्रदूषण पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. उद्योगाने पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि पर्यायी इंधनासाठी संशोधन आणि विकासावर खर्च केला पाहिजे, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. 

मोदी सरकारची BPCL खासगीकरणासाठी तयारी सुरू; ‘या’ तीन कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ

पर्यावरण संरक्षणासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल

असे केल्याने आयात बिल कमी होईल आणि पर्यावरण संरक्षणासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. भारताच्या जीडीपीमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचा वाटा सध्याच्या ७.१ टक्क्यांपेक्षा १२ टक्क्यांपर्यंत वाढला पाहिजे आणि रोजगाराच्या दृष्टीने या क्षेत्राचे योगदान सध्याच्या ३७ मिलियनवरून ५० मिलियनपर्यंत वाढले पाहिजे. देशाला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात ऑटोमोबाईल उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. आता भारतात अनेक बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह ब्रँड उपलब्ध आहेत आणि सरकार देशाला अव्वल जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र बनवण्यासाठी काम करत आहे, असे नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 
 

Web Title: nitin gadkari urges carmakers to avoid selling diesel cars and promote alternatives technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.