...तर बुलडोझरखाली चिरडेन!" नितीन गडकरींची कंत्राटदारांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 08:22 AM2018-05-19T08:22:38+5:302018-05-19T08:31:38+5:30
बेतुलमधील एका जनसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ठेकेदारांना धमकी दिल्याचं सांगितलं.
भोपाळ- केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे. नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना दिलेल्या धमकीमुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत. बेतुलमधील एका जनसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना धमकी दिल्याचं सांगितलं. 'काम योग्य झालं नाही किंवा कामात काही गडबड झाली तर मातीऐवजी तुम्हाला बुलडोझर खाली चिरडेन', अशी धमकी कत्रांटदारांना दिल्याचं स्वतः नितीन गडकरी यांनी म्हटलं.
नितीन गडकरी म्हणाले की, ' इथे जितके कंत्राटदार काम करतात त्यापैकी एकही दिल्लीहून आलेला नाही. एकाही रुपयाचा भ्रष्टाचार नाही. या रस्त्यांचे मालक तुम्ही आहात. काम योग्य झालं आहे की नाही हे पाहणं तुमचं काम आहे. जर कामात गडबड झाली तर बुलडोझर खाली मातीच्या जागी तुम्हाला चिरडून टाकीन, असं कंत्राटदारांना बजावलं आहे'. नितीन गडकरी यांच्या या वादग्रस्त विधानवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
बेतुलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानसुद्धा उपस्थित होते. 'देशात निधीती कमतरता नाही. भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केलं जाणार नसल्याचंही नितीन गडकरी यांनी म्हटलं. पैसा हा ठेकेदारांसाठी नसून तो देशातील गरिब जनतेसाठी असल्याचं त्यांनी म्हटलं.