पश्चिम बंगाल : सिलिगुडीमध्ये कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर नितीन गडकरींची तब्येत बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 02:59 PM2022-11-17T14:59:33+5:302022-11-17T15:01:47+5:30
पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती अचानक बिघडली. हा कार्यक्रम पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील डागापूर येथे होता.
पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती अचानक बिघडली. हा कार्यक्रम पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील डागापूर येथे होता. अचानक तब्येत बिघडल्यानंतर जवळच्या रुग्णालयाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. शुगर कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका योजनेच्या उद्घाटनासाठी नितीन गडकरी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे गेले आहेत. त्यांनी सिलीगुडीमध्ये 1206 कोटी रुपये खर्चाच्या 3 NH प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या कार्यक्रमानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर सुकना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक पोहोचून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. आता नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.
साधूच्या वेशात सैतान! हात जोडले, दान मागतिले अन् माजी खासदारावर केला हल्ला
या अगोदरही नितीन गडकरींची प्रकृती खालावली होती. यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये अहमदनगर येथे एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली होती. गडकरी व्यासपीठावर बेशुद्ध पडले होते. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते.