...तर पेट्रोल १५ रुपये लिटर मिळेल, नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 09:21 PM2023-07-05T21:21:20+5:302023-07-05T21:22:32+5:30

नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला.

nitin n gadkari says petrol price will be at 15 per litre if ethanol and electricity vehicles runs | ...तर पेट्रोल १५ रुपये लिटर मिळेल, नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला; वाचा सविस्तर

...तर पेट्रोल १५ रुपये लिटर मिळेल, नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला; वाचा सविस्तर

googlenewsNext

देशात पेट्रोल फक्त १५ रुपये लिटर मिळू शकेल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. राजस्थानमधील प्रतापगड येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरल्यास पेट्रोल १५ रुपये प्रतिलिटरने उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे प्रदूषणही संपेल. यासोबतच इंधनाची आयातही कमी होऊ शकते, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.

कारण काय? एकनाथ शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक; थोड्य़ाच वेळात सुरु होणार

 'शेतकरी आता फक्त अन्नदाता बनणार नाही, तर ऊर्जा देणाराही बनेल. मी ऑगस्ट महिन्यात टोयोटा कंपनीची वाहने लाँच करत आहे. ही सर्व वाहने शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालतील. ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज, त्याची सरासरी पकडली तर पेट्रोलची किंमत १५ रुपये प्रतिलिटर होईल, असेही ते म्हणाले. 

इथेनॉलवर वाहने धावतील तेव्हा कमी खर्चात जनतेला फायदा होईल, शेतकऱ्यांनाही फायदा होईल,  यासोबतच देशालाही फायदा होणार आहे. सध्या इंधनाची आयात १६ लाख कोटी रुपयांची आहे, ती इथेनॉल वापरून कमी करता आली, तर हा पैसा परदेशात पाठवण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाईल. शेतकरीही आनंदी होतील, असंही गडकरी म्हणाले. 

पुढील महिन्यात नितीन गडकरी टोयोटा कंपनीची इनोव्हा कार लॉन्च करणार आहेत, यामध्ये १०० टक्के फ्लेक्स इंधन इंजिन असेल आणि ती १०० टक्के इथेनॉलवर चालेल.

इथेनॉल उसापासून तयार केले जाते आणि भारतात लाखो ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे आहे. आज शेतकरी इथेनॉल आणि सौरऊर्जेचे उत्पादन करून फक्त अन्नच नव्हे तर ऊर्जा पुरवठादारही आहेत. येत्या काही दिवसांत देशातील दुचाकीपासून सर्व प्रकारची वाहने इथेनॉलवर चालतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली. 

५ वर्षात पेट्रोल-डिझेलला अलविदा करणार, राजस्थानच्या प्रतापगडमध्ये ५६०० कोटी रुपयांच्या ११ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि बांधकाम सुरू करताना नितीन गडकरींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की देशातील वाहन उद्योगाची उलाढाल सुमारे ७.५५ लाख कोटी रुपये आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने योजना तयार केल्याचे गडकरींनी सांगितले.

Web Title: nitin n gadkari says petrol price will be at 15 per litre if ethanol and electricity vehicles runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.