नितीश कुमारांचे एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल! मंत्रिमंडळ विस्तारात स्मार्ट खेळी; कुणाला लॉटरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 09:58 AM2022-08-16T09:58:23+5:302022-08-16T09:59:00+5:30

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या महागठबंधन सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाल सांधी मिळणार याची संभाव्य यादी तयार करण्यात आली आहे.

nitish kumar and tejashwi yadav govt cabinet expansion in bihar | नितीश कुमारांचे एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल! मंत्रिमंडळ विस्तारात स्मार्ट खेळी; कुणाला लॉटरी?

नितीश कुमारांचे एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल! मंत्रिमंडळ विस्तारात स्मार्ट खेळी; कुणाला लॉटरी?

googlenewsNext

पाटणा: महाराष्ट्रात झालेल्या सत्तापालटानंतर अवघ्या काही दिवसांत नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेपासून दूर करत नवे सरकार स्थापन केले अन् बिहारमध्ये राजकीय भूकंप झाले. केवळ भाजपशी असलेली युती तोडली नाही, तर नितीश कुमार एनडीएमधूनही बाहेर पडले. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा शपथविधी झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे. 

बिहारमध्ये जदयू आणि राजदच्या महागठबंधनच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाल सांधी मिळणार याची संभाव्य यादी बनण्यात तयार करण्यात आली आहे. जदूय, राजद आणि काँग्रेसने मंत्र्यांची यादी निश्चित केली आहे. राज्यपाल फागू चौहान नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असणाऱ्यांना मंत्री म्हणून पुन्हा संधी दिली. त्याचप्रमाणे नितीश कुमार यांनी भाजपसोबत सरकार असताना जदयूकडून जे मंत्री होते त्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे.

कुणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

जदयूने २०२० च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ज्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली होती. त्यांनाच पुन्हा नव्या सरकारमध्ये मंत्री बनवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. जदयूच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत पक्षाच्या आमदारांना याबाबत माहिती दिली असल्याचे समोर आले आहे. जदयूकडून सुरुवातीला जुन्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांचा पत्ता कट करण्याची चाचपणी करण्यात आली होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले.

दरम्यान, विजय कुमार चौधरी, बिजेन्द्र प्रसाद यादव, अशोक चौधरी, श्रवण कुमार, संजय कुमार झा, लेशी सिंह, सुनील कुमार, जयंत राज आणि जमा खान तर अपक्ष सुमित कुमार सिंह, जीतनराम मांझी यांच्या हम पार्टीचे संतोष कुमार सुमन मंत्री होऊ शकतात. तर, राजद आणि काँग्रेस यांच्याकडून मंत्रिमंडळात कुणाला संधी दिली जाणार हे पाहावे लागणार आहे. तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी शपथ घेताच भाजपने त्यांना नोकऱ्यांच्या मुद्यावरुन घेरण्याचा प्रयत्न केला होता.
 

Web Title: nitish kumar and tejashwi yadav govt cabinet expansion in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.