नितीश कुमार बनले चौथ्यांदा मुख्यमंत्री

By admin | Published: February 23, 2015 05:16 AM2015-02-23T05:16:28+5:302015-02-23T05:16:28+5:30

बिहारच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे नितीश कुमार यांनी रविवारी चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Nitish Kumar became the fourth chief minister of the state | नितीश कुमार बनले चौथ्यांदा मुख्यमंत्री

नितीश कुमार बनले चौथ्यांदा मुख्यमंत्री

Next

पाटणा : बिहारच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे नितीश कुमार यांनी रविवारी चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जितनराम मांझी यांनी जबर आव्हान उभे केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा टाकत नितीश कुमार यांना नऊ महिन्यांनंतर पुन्हा पदारूढ होण्यात यश आले.
राजभवनात राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी ६३वर्षीय नितीश कुमार आणि २२ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यात तीन महिला आमदारांना स्थान मिळाले आहे. मांझी यांच्या सरकारमधून राजीनामा देणाऱ्या २० मंत्र्यांना पुन्हा स्थान मिळाले असून, उर्वरित २ मंत्र्यांची मांझी यांनी हकालपट्टी केली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांचे टिष्ट्वटरद्वारे अभिनंदन केले.

Web Title: Nitish Kumar became the fourth chief minister of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.