'लग्नानंतर पुरुष रोज रात्री...', मुख्यमंत्री नितीश कुमार विधानसभेत काय बोलून गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:32 PM2023-11-07T18:32:44+5:302023-11-07T18:34:06+5:30
बिहार विधानसभेत महिला साक्षरतेवर बोलताना नितीश कुमारांनी विचित्र उदाहरण दिले. यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.
Nitish Kumar Bihar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका विचित्र वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आज बिहार विधानसभेत जातीवर आधारित सर्वेक्षणाची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. यावेली चर्चेदरम्यान नितीश कुमार यांच्या एका वक्तव्यावरून वाद झाला. लोकसंख्या नियंत्रण आणि महिला साक्षरतेवर बोलताना नितीश यांनी विचित्र वक्तव्य केले.
भारत की राजनीति में नीतीश बाबू जैसा अश्लील नेता देखा नहीं होगा।
— BJP Bihar (@BJP4Bihar) November 7, 2023
नीतीश बाबू के दिमाग में एडल्ट "B" Grade फिल्मों का कीड़ा घूस गया है। सार्वजनिक रूप से इनके द्विअर्थी संवादों पर पाबंदी लगानी चाहिए।
लगता है संगत का रंगत चढ़ गया है!#MemoryLossCM#AslilNitishpic.twitter.com/WFFLrE5brT
चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल.
संबंधित बातमी- आरक्षणाची मर्यादा 50 वरुन 75% करणार, बिहारचे सीएम नितीश कुमार यांनी मांडला प्रस्ताव
या वक्तव्यादरम्यान संपूर्ण सभागृहातील नेते चकीत झाले. यावर महिला आमदार संतप्त दिसल्या, तर इतर काही आमदार हसत होते. आपल्या भाषणात नितीश पुढे म्हणाले की, 2011 च्या जनगणनेच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण 61 टक्क्यांवरून 79 टक्क्यांच्या वर पोहोचले आहे. स्त्री साक्षरतेत बरीच सुधारणा झाली आहे. हा आकडा 51 टक्क्यांवरून 73 टक्क्यांच्या वर गेला आहे. मॅट्रिक पासची संख्या 24 लाखांवरून 55 लाखांवर गेली आहे. पदवीधर महिलांची संख्या 4 लाख 35 हजारांवरून 34 लाख झाली आहे.
भाजप आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
नितीश यांच्या वक्तव्यावर आमदारांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. भाजप नेते तारकिशोर प्रसाद म्हणाले की, मुख्यमंत्री हे वेगळ्या पद्धतीने बोलू शकले असते. तर भाजप आमदार निक्की हेमब्रम म्हणाल्या की, मुख्यमंत्री दुसऱ्या शब्दात समजावून सांगायला हवे होते. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर नव्हता. यावर नितीश कुमारांनी प्रतिक्रिया दिली नाही.