नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदी; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 05:50 AM2020-11-16T05:50:11+5:302020-11-16T06:27:34+5:30

Bihar Election: बिहारमध्ये रालोआच्या बैठकीत शिक्कामोर्तब; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता

Nitish Kumar as Chief Minister; Curiosity about the post of Deputy CM in Bihar | नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदी; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता

नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदी; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, यावर रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. सोमवारी नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मात्र, उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे सोपविले जाईल, याबाबत उत्सुकता असून तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांची नावे या पदासाठी आघाडीवर आहेत. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी तारकिशोरप्रसाद सिंह यांची निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२५ जागांवर विजय मिळाला. रालोआला निसटते बहुमत मिळाले असले तरी नितीशकुमार यांच्या जदयुला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावे लागले.

पद स्वीकारण्यासाठी नव्हते तयार 
तत्पूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची नितीश यांची तयारी नव्हती. भाजपमधून कोणीतरी ही जबाबदारी स्वीकारावी, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, भाजपने त्यांनाच ही जबाबदारी स्वीकारण्याची गळ घातली.

सुशीलकुमार यांच्या ट्विटमुळे खळबळ
बिहारचे मावळते उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी नाराज असल्याचे समजते. मोदी यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड जाहीर होईल, असे अपेक्षित होते. मात्र, बैठकीत याबाबत निर्णय झाला नाही. 
n सुशीलकुमार मोदी यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ‘४० वर्षांच्या राजकीय प्रवासात संघ परिवार आणि भाजपने मला खूप काही दिले आहे. 
n अन्य कोणीही मला तेवढे देऊ शकले नसते. यापुढेही पक्षाकडून मिळणाऱ्या जबाबदारीचे मी स्वागतच करेन. माझे कार्यकर्तापद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’, असे ट्विट मोदी यांनी केल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

आज शपथविधी 
nया सर्व पार्श्वभूमीवर रविवारी नितीशकुमार यांच्या शासकीय निवासस्थानी रालोआच्या घटक पक्षांची बैठक झाली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नितीशकुमार यांची एकमुखाने नेतेपदी निवड करण्यात आली. 
nत्यामुळे बिहारचे पुढील मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, यावर शिक्कामोर्तब झाले. नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीशकुमार यांनी राज्यपाल फगु चौहान यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. 
nराज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडेल, असे नितीशकुमार यांनी राज्यपाल भेटीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.

Web Title: Nitish Kumar as Chief Minister; Curiosity about the post of Deputy CM in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.