"मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही"

By बाळकृष्ण परब | Published: November 27, 2020 05:54 PM2020-11-27T17:54:54+5:302020-11-27T17:58:05+5:30

Nitish Kumar News : महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोपांचे हे सत्र वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे.

"Nitish Kumar did not give birth to another child as he will have a daughter." - Tejashwi Yadav | "मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही"

"मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही"

Next
ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप मुलगी होईल म्हणून नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाहीनितीश कुमार हे हत्येच्या प्रकरणातील आरोपी आहेत

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा निसटता पराभव झाल्यापासून महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोपांचे हे सत्र वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे. आज बिहार विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुरू केले. मुलगी होईल म्हणून नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही, अशी मुक्ताफळे तेजस्वी यादव यांनी उधळली.

तेजस्वी यादव म्हणाले की, मुलगी जन्माला येईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही. नितीश कुमार हे हत्येच्या प्रकरणातील आरोपी आहेत. तसेच त्यांना कॉपीराइट उल्लंघनाच्या एका प्रकरणात २५ हजार रुपये दंड भरावा, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला आहे.

तेजस्वी यादव यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना संसदीय कार्यमंत्री विजयकुमार चौधरी यांनी सांगितले की, हत्येच्या प्रकरणाचा खटला पाटणा हायकोर्टाने आधीच फेटाळून लावला आहे. तसेच कोर्टाने या आरोपांवर कठोर टिप्पणी केली आहे. त्यानंतर संसदीय कार्यमंत्र्यांनी सभागृहाच्या कामकाजामधून हे आरोप फेटाळून लावण्यात यावेत, असे निवेदन विधानसभा अध्यक्षांना दिले आहे.

त्यानंतर तेजस्वी यादव यांनी पुन्हा आरोप करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नितीश कुमार यांनीही आरोप करण्यात सुरुवात केली. ते म्हणाले की, तेजस्वी यादव तुम्ही चार्जशिटेड आहात. माझ्या मित्राचे पुत्र आहात. त्यांना मी नेते बनवले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. तेजस्वी यादव यांची चौकशी करा. त्यांच्याविरोधात कारवाई होईल. हे खोटे बोलत आहेत. माझ्या भावासमान मित्राचा मुलगा आहे, म्हणून ऐकून घेतो, असा संताप नितीश कुमार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर हल्लाबोल केला होता. लालूप्रसाद यादव यांनी मुलगा हवा या हव्यासापोटी लालूप्रसाद यादव यांनी नऊ मुलींना जन्म दिला, लालूंना मुलींवर विश्वास नव्हता, असा आरोप नितीश कुमार यांनी केला होता.

Web Title: "Nitish Kumar did not give birth to another child as he will have a daughter." - Tejashwi Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.