"नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे नव्हते; नेत्यांनी मन वळविल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 01:41 AM2020-12-29T01:41:13+5:302020-12-29T01:41:31+5:30

बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये नितीशकुमार यांच्या नावावर एनडीएने मते मागितली होती.

Nitish Kumar did not want to be the Chief Minister again | "नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे नव्हते; नेत्यांनी मन वळविल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले"

"नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे नव्हते; नेत्यांनी मन वळविल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले"

Next

पाटणा : पुन्हा मुख्यमंत्री होण्याची नितीशकुमार यांची इच्छा नव्हती. मात्र एनडीएतील भाजप, हिंदुस्थानी अवाम मोर्चा असे घटक पक्ष व काही महत्त्वाच्या नेत्यांनी नितीशकुमारांचे मन वळविल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले असे त्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये नितीशकुमार यांच्या नावावर एनडीएने मते मागितली होती. हे भाजप व जनता दल (यु)च्या नेत्यांनी नितीशकुमार यांना आवर्जून सांगितले.  

Web Title: Nitish Kumar did not want to be the Chief Minister again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.