नितीश कुमारांची मोठी घोषणा! प्रति लीटर डिझेलमागे ६० रुपयांचे अनुदान; शेतकऱ्यांसाठी खूशखबर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:01 PM2022-07-21T14:01:30+5:302022-07-21T14:02:22+5:30
बिहार सरकार डिझेल अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी डिझेल सबसिडी देत आहे. डिझेल पंप संचाने शेतात सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
पटना : बिहारमधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पेटारा खोलला आहे. दुष्काळामुळे मुख्यमंत्र्यांनी डिझेलमागे प्रति लीटर ६० रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मंगळवारीच त्यांच्या मंत्रिमंडळाने याचा निर्णय घेतला. आकस्मिक निधीसाठी बिहार सरकार २०२२-२३ मध्ये सुरुवातीला २९ कोटी ९५ लाख रुपये खर्च करणार आहे.
याद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी एकरी १० लीटर डिझेल अनुदानातून दिले जाणार आहे. या १० लीटरसाठी ६०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. एवढेच नाही तर तागाच्या शेतीसाठी सिंचन करण्यासाठी प्रति एकर १२०० रुपये दिले जाणार आहेत. यानुसार अधिकाधिक प्रति एकर १८०० रुपये दिले जाणार आहेत.
बिहार सरकार डिझेल अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी डिझेल सबसिडी देत आहे. डिझेल पंप संचाने शेतात सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने डिझेल अनुदान योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रतिलिटर 60 रुपये अनुदान देणार आहे. एक एकर सिंचनासाठी 10 लिटर डिझेलच्या वापरानुसार एकूण 600 रुपये प्रति एकर मोबदला मिळेल. बिहार सरकारच्या कृषी विभागाने सिंचनासाठी डिझेलवर दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी वेबसाईट जारी केली आहे. याशिवाय शेतकरी त्यांच्या जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात.