देशातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र; एकाच वेळी २५००० विद्यार्थी देऊ शकतात परीक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 11:08 AM2023-08-24T11:08:47+5:302023-08-24T11:09:15+5:30
हे परीक्षा केंद्र अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.
शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची पावले टाकत बिहारने आपल्या नावावर एक बहुमान मिळवला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पाटण्यातील कुम्हरार येथील देशातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र बापू परीक्षा संकुल म्हणून तयार झाले आहे. हे परीक्षा केंद्र अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी पाटणा येथील कुम्हरार येथे नव्याने बांधलेल्या देशातील सर्वात मोठ्या परीक्षा केंद्र बापू परीक्षा केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी परीक्षा केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून इतर ठिकाणी त्याचे बांधकाम सुरू असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. पाटणा येथे बांधण्यात आलेल्या बापू परीक्षा केंद्रात २५००० विद्यार्थी एकाच वेळी परीक्षा देऊ शकतील. सहा एकरात पसरलेले हे परीक्षा केंद्र पाच मजली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्याची सुविधा आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिल्या ते पाचव्या मजल्यापर्यंतच्या परीक्षा हॉल आणि विविध खोल्यांची पाहणी केली. तसेच येथे केलेल्या सर्व व्यवस्थेची सविस्तर माहिती घेतली. यावेळी हे परीक्षा केंद्र २६१.११ कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले आहे. पाच मजली इमारत दोन ब्लॉक A आणि B मध्ये विभागली आहे. तसेच, २० हजार ते २५ हजार विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा देण्याची व्यवस्था आहे, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.
आज पटना में नवनिर्मित देश के सबसे बड़े परीक्षा केंद्र ‘बापू परीक्षा परिसर’ का उद्घाटन किया। 261.11 करोड़ रू० की लागत से लगभग 6 एकड़ में फैले बापू परीक्षा परिसर में 20 हजार से अधिक विद्यार्थियों के ऑनलाइन और ऑफलाइन परीक्षा देने की व्यवस्था की गई है। इससे विभिन्न परीक्षाओं के आयोजन… pic.twitter.com/2ZZoaBcoJl
— Nitish Kumar (@NitishKumar) August 23, 2023
इंजिनीअरिंग आणि मेडिकलसाठी मोफत कोचिंग
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत इंजिनीअरिंग आणि मेडिकलची तयारी करता येईल. परीक्षेच्या तयारीसाठी पाटणा विभागात मोफत कोचिंग सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांसाठी २९ जिल्ह्यांमध्ये परीक्षा हॉल उभारण्यात येणार आहेत.