नितीश कुमारांना झटका, उच्च न्यायालयाकडून दारुबंदी कायदा रद्द
By admin | Published: September 30, 2016 01:23 PM2016-09-30T13:23:03+5:302016-09-30T13:25:13+5:30
पाटणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी बिहार सरकारला झटका दिला. बिहार सरकारने केलेल्या दारुबंदी कायद्याला बेकायद ठरवत हा कायदा रद्द केला.
Next
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ३० - पाटणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी बिहार सरकारला झटका दिला. बिहार सरकारने केलेल्या दारुबंदी कायद्याला बेकायद ठरवत हा कायदा रद्द केला. एक ऑगस्ट रोजी बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दारुबंदी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यपाल राम नाथ कोविंद यांनी या विधेयकाला मंजुरी दिली होती.
या विधेयकात अनेक कठोर तरतुदी करण्यात आल्या होत्या. घरात दारुची बाटली सापडली तर, घरातील सर्व प्रौढ सदस्यांना अटक करण्याची तरतुद या विधेयकात होती. या विधेयकातील सर्व कलमे अजामीनपात्र होती.
बिहार विशेष न्यायालय कायद्यातंर्गत फक्त विशेष कोर्टामध्येच दारुबंदीच्या खटल्यांची सुनावणी करता येणार होती. बिहारमधील या विशेष कोर्टात सध्या फक्त भ्रष्टाचार आणि सीबीआय प्रकरणांची सुनावणी होते.