नितीश कुमार यांनी स्वतःकडे ठेवले गृहखाते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:08 AM2020-11-18T05:08:07+5:302020-11-18T05:10:02+5:30
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्याकडे शिक्षण खाते
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर खातेवाटप कशा प्रकारे होणार याची उत्सुकता होती. अखेर नितीश कुमारांनी आपल्या नवनियुक्त मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले आहे. गृह खात्यावरून भाजपा आणि जदयु यांच्यात रस्सीखेच होती. मात्र, नितीश कुमारांनी आणि सामान्य प्रशासन ही खाती स्वतःकडेच ठेवली आहेत.
उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थ खात्यासोबतच वाणिज्य आणि वन पर्यावरण विभागाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर दुसऱ्या उपमुख्यमंत्री रेणु देवी यांच्याकडे महिला कल्याण खाते देण्यात आले आहे. जदयुच्या विजय कुमार चौधरी यांना ग्रामीण विकास खाते देण्यात आले आहे. नितीश कुमारांचे निकटवर्ती अशोक चौधरी यांच्याकडे गृह निर्माण, अल्पसंख्याक कल्याण, विज्ञान, उद्योग आणि समाज कल्याण ही खाती सोपविण्यात आली आहेत. पहिल्यांदाच मंत्री होत असलेल्या मेवालाल चौधरी यांना शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, शीला देवी यांना परिवहन, संतोष सुमन यांना लघु जलसिचंन, जलसंधारण, मुकेश साहनी यांना पशु, मत्स्यसंवर्धन, मंगल पांडेय यांना आरोग्य आणि रस्तेनिर्माण ही खाती देण्यात आली आहेत.
तसेच, विजेंद्र यादव यांना ऊर्जा आणि उत्पादन, रामसूरत राय यांच्याकडे राजस्व आणि कायदे, अमरेंद्र प्रताप सिंह यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
संयुक्त अधिवेशन
२३ नोव्हेंबरला
विधिमंडळाचे पहिले संयुक्त अधिवेशन २३ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत होइ�ल. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी नवनियुक्त मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. जीतन राम मांझी यांना प्रोटेम स्पीकर करण्यात आले आहे.